जादुगार रियाने भारताचे नाव पोचवले आंतरराष्ट्रीय पातळीवर !
निमगाव पागाची रिया कानवडे ज्यूनियर मॅजिशियन चॅम्पियनशिप ची विजेती !!

प्रतिनिधी–
संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील लिटिल जादूगर रिया भागवत कानवडे हिने श्रीलंका देशातील श्रीलंका मॅजिशियन सोसायटी यांच्यातर्फे आयोजित इंटरनॅशनल मॅजिशियन जुनियर कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत जगभरातील ११ देशांचा सहभाग होता.

भारतातर्फे रियाने या स्पर्धेत भाग घेऊन जुनिअर कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने आपल्या भारत देश महाराष्ट्र राज्य तसेच आपल्या गावाचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचविले आहे.

संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा गावातील अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेत यांनी आपल्या लहानपणातच आपले नाव सातासमुद्रापलीकडे पोचवले आहे. १४ वर्षे रिया जादूगर के भागवत यांच्या कन्या आहेत. जादू या कलेचे बाळकडू तिला वडिलांकडूनच मिळाले आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने रियाचे संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.

या आधी तिला विविध पुरस्कार मिळालेले आहेत.जादू ही कला विज्ञान आणि हातचलाखी वर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या या कलेची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली याचा तिला अभिमान आहे. यापूर्वीही तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं तिचे कौतुक होत आहे.
