१४ वर्षीय जादूगार रिया हिला राष्ट्रीय जादू पुरस्कार प्रदान !
प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील १४ वर्षीय जादूगार रिया कानवडे हिला राष्ट्रीय जादूगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रविवार १३ मार्च रोजी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात नाशिक येथील कालिदास नाट्यगृहात इंटरनॅशनल जादूगार हिला हा मानाचा राष्ट्रीय जादू पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी इंटरनॅशनल जादूगार मधुगंधा इंद्रजीत, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे, झी मराठी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ फेम हार्दिक जोशी, ग्लोबल युनिव्हर्स क्वीन विनर पुनम बिरारी, सोनी पैठणी नाशिकचे संचालक संजय सोनी, सतीश नाना कुलकर्णी, संत गजानन शेगावीचाचे फिल्म अभिनेत्री किरण के राव, अभिनेत्री सुरेखा लामगे आदि उपस्थित होते. यावेळी येथे रियाचा मॅजिक शो ही झाला.

लहानपणापासूनच जादूचे बाळकडू आपले वडील जादूगर के. भागवत त्यांच्याकडून तिला मिळाले आहेत. ८ एप्रिल रोजी श्रीलंका येथे श्रीलंका मॅजिशियन सोसायटी आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी महिला जादूगार म्हणून भारतातर्फे तिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतासह जगातील सहा देशांचा सहभाग आहे. रियाला या स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
