पत्रकारांनी केलेला सन्मान हा पुढील कामाला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा — नरेंद्र साबळे

प्रतिनिधी —

तारेवरची कसरत असणाऱ्या आणि कायम हॉट चेअरवर असणाऱ्या पोलीस ठाण्याचे काम करणे अत्यंत अवघड असते. मात्र आपल्याच खात्याकडून आणि नागरिकांकडून जेंव्हा चांगल्या कामाची पावती मिळते त्या वेळेस आनंद होतो. अकोले तालुका पत्रकार संघाने राजुर पोलिसांच्या कार्याचा गौरव करून जो सत्कार केला तो आम्हाला नेहमीच प्रेरणादायक आणि ऊर्जा देणारा असेल असे प्रतिपादन राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलिस स्टेशनला उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून गृहविभागाच्या वतीने नुकतेच गौरविण्यात आले. यानिमित्ताने राजूर पोलीस स्टेशनच्या कामाचे कौतुक करण्यासाठी अकोले तालुका पत्रकार संघाने राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, नुकतेच पदोन्नती झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांचा राजूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी साबळे बोलत होते.

साबळे म्हणाले की, प्रशासनात पोलीस खात्यात काम करताना अनेक बरे वाईट अनुभव येतात. मात्र आपण कामाशी प्रामाणिक राहिल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येतो. यातून पोलीस खात्याची प्रतिमा उंचावता येते. कुठलेही काम टीम वर्क शिवाय होत नाही. राजूर पोलिस स्टेशनचा राज्यातील पाचव्या क्रमांकाचा पोलीस स्टेशन म्हणून जो सन्मान झाला तो तत्कालीन पोलीस अधिकारी नितीन पाटील व माझे सर्व सहकाऱ्यांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी गुन्ह्यांचा तपास व उकल करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी सांगितले.

माणुसकीच्या कायद्याने केलेले काम अधिक सुककार होते. यातून कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होते आणि लोकांचा विश्वास संपादन करता येतो असे यावेळी नितीन खैरनार यांनी सांगितले. नितीन खैरनार यांच्या पदोन्नती बद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पत्रकार संघाचे विश्वस्त एस.टी येलमामे, शांताराम काळे, सुनील गीते, श्रीनिवास रेणुकादास यांनी राजूर पोलीस स्टेशनच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक करत राजूर पोलिस स्टेशनचा राज्यात पाचव्या क्रमांकावर झालेला गौरव हा जिल्ह्याला व तालुक्याला भूषणावह व अभिमानास्पद असल्याचा सांगितले.  संघाचे अध्यक्ष सुनील गीते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर सचिव प्रवीण धुमाळ यांनी आभार मानले.

पत्रकार संघाचे पदाधिकारी राजेंद्र जाधव, विलास तुपे, विनायक घाटकर, भगवान पवार, ललित मुर्तडक, आकाश देशमुख, संजय महानोर, नितीन शहा, आबासाहेब मुंडलिक, अण्णासाहेब चौधरी, संजय फुलसुंदर, नंदलाल शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे आदी उपस्थित होते.

RRAJA VARAT

One thought on “पत्रकारांनी केलेला सन्मान हा पुढील कामाला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा — नरेंद्र साबळे”
  1. फक्त सत्कार ठिक आहे.
    पोलीसांनी कर्तव्य बजावत रहावे.
    केल्यावर अपेक्षा ठेवणे आवश्यक नाही.
    एक दिवस सत्कार उरलेले दिवस शिव्या ऐकण्याची तयारी असेल तर पोलीसांनी अपेक्षा ठेऊ नये असे मला वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!