राज्याच्या भवितव्यासाठी जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी —      आमदार डॉ. तांबे

 रोजगार निर्मिती,  शिक्षकभरती  बाबत विधानपरिषदेत आवाज

 प्रतिनिधी — 

मागील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले असून पंचसूत्रीचा माध्यमातून शिक्षण, उद्योग व आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. राज्याची अर्थव्यवस्था व प्रगती साधायची असेल तर शिक्षण व्यवस्था ही जागतिक दर्जाची होण्यासाठी प्रभावी उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे. याच बरोबर शिक्षक भरती सह सर्व शाळा अनुदानित करा अशी आग्रही मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

आमदार डॉ तांबे म्हणाले की, शेती, सहकार व उद्योग हे महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. यामध्ये अधिकाधिक काम होणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मागील अनेक दिवसापासून शिक्षकांची भरती झाली नाही. गुणवत्तेचे शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे. याचबरोबर राज्यातील सर्व शाळा शंभर टक्के अनुदानित करा. शाळांना वेतनेतर अनुदानासह संगणकीय लॅब यासाठी अनुदान देणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्था सुधारली, जागतिक दर्जाची झाली त्याचा प्रभाव इतर क्षेत्रांवर पडतो. आणि त्या माध्यमातून प्रगती साधत होते. म्हणून राज्याच्या विकासाकरता  शिक्षण हे जागतिक दर्जाचे होणे अत्यंत गरजेचे आहे .

याचबरोबर विविध एमआयडीसी मध्ये काही आजारी उद्योग आहे. या आजारी उद्योगांकडे हजारो एकर जागा पडून आहे. याबाबत सरकारने प्राधान्याने विचार करून त्या ठिकाणी नवीन उद्योग स्थापन करणे किंवा ती जागा इतर उद्योगांना देणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी करताना राज्यभरातील गायरान जमिनी ह्या क्रीडांगणासाठी वापरण्यात यावयात असेही आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

सध्या राज्यामध्ये विना पुराव्याचे बेछुट आरोप होत असून त्यामधून वातावरण हे गढूळ होत आहे. जातीय धार्मिक तेढ निर्माण होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून सर्वांनी राज्यात चांगले वातावरण राहण्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

RRAJA VARAT

One thought on “राज्याच्या भवितव्यासाठी जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी —      आमदार डॉ. तांबे”
  1. भारताची शिक्षण पद्धती नुसार शाळा चालवली तरी खुप चांगले होईल!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!