करुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शैक्षणिक साहित्य प्रदान

विवो मोबाईल व उर्मी संस्थेचा उपक्रम
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील करुले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विवो कंपनी व उर्मी संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे व मिलिंद कानवडे यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील करुले येथील प्राथमिक शाळेस विवो कंपनी सीएसआर फंडातून शालेय उपयोगी कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, प्रोजेक्टर स्क्रीन, प्रिंटर, पाच फॅन, म्युझिक सिस्टम, बिग ग्रीन बोर्ड, वॉटर फिल्टर, खेळाचे साहित्य प्रदान केले.
जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील मिलिंद कानवडे, गट शिक्षणाधिकारी के. के. पवार, विवोचे व्यवस्थापक तेजस डेव्हीड, गणेश महामुनी, प्रमोद वाघ, अर्पण पराटे, वैभव शहा, संगमनेर मोबाईल असोशिएशनचे अध्यक्ष निलेश कोळपकर, उर्मी संस्थेचे आदिनाथ दरवडे, पोलीस पाटील अशोक कोल्हे, माजी सैनिक मोहन आहेर, संदीप आखाडे, सरपंच कल्पना कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे चांगदेव आहेर उपस्थित होते.

विवो ही पहिली मोबाईल कंपनी आहे, जी शाळेना इन्फास्ट्रक्चर विकासासाठी मदत करत आहे आणि शैक्षणिक विकासातुनच ग्रामीण भागाचा विकास होवू शकेल असे मत विवोचे व्यवस्थापक तेजस डेव्हिड यांनी व्यक्त केले. महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कौशल्या फटांगरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
