अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात नुकसान नाही !
तहसील कार्यालयाची माहिती
प्रतिनिधी —
संगमनेर शहर व तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोणतेच नुकसान झाले नसल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून मिळाली आहे. मात्र एका ठिकाणी गायीच्या अंगावर वीज पडून ती मरण पावल्याची घटना घडली आहे.

मौजे खंदरमाळवाडी येथील खातेदार बाळासाहेब भागवत यांच्या गाईवर वीज पडल्याने गाय मृत झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी संगमनेर शहर व तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. पाऊस मुसळधार होता. विजांचा कडकडाट होत होता. ढगांचा गडगडाट देखील होता. पावसामुळे शहरातील लोकांची चांगलीच धावपळ झाली. मात्र संगमनेर शहर व परिसरात आणि तालुक्यात कुठल्याही प्रकारे नुकसान झाले नसल्याचे तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.
