महात्मा फुले चौक, पावबाकी येथील सर्कलचे काम पाच महिन्यांपासून अर्धवटच !
महात्मा फुले जयंतीच्या १५ दिवस आधी सुरू झालेले काम अद्याप अपूर्ण ; नागरिकांचा सवाल – छोट्या कामासाठी आणखी किती दिवस ?
संगमनेर प्रतिनिधी –
महात्मा फुले चौक, पावबाकी येथे सर्कल उभारण्याचे काम सुरू होऊन तब्बल पाच महिने उलटले, तरीही हे काम अद्याप अर्धवट अवस्थेतच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महात्मा फुले जयंती ११ एप्रिल असल्याने त्याच्या सुमारे १५ दिवस आधी हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, काही काळ काम सुरू राहिल्यानंतर ते अर्धवट बंद पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
छोट्या स्वरूपाच्या या कामाला एवढा मोठा कालावधी का लागत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संगमनेर नगरपरिषदेकडून विकासकामे सुरू केली जातात; मात्र ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अपूर्ण अवस्थेतील सर्कलमुळे परिसराचे स्वरूपही विस्कळीत दिसत असून, संबंधित विभागाने या कामाची तातडीने दखल घेऊन सर्कलचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे.
सर्कलचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ओम रविंद्र पावबेाके, आदित्य शिवदास हिरे, रविंद्र पुंजा सातपुते, सुरज हौशीराम भालेराव, योगेश बाळू पावबाके, चंद्रकांत मच्छिंद्र पावबेाके, किशोर अशोक सातपुते, संदीप बच्छाव सातपुते, बाबासाहेब अशोक राऊत, सुनील रामनाथ सातपुते, निलेश सातपुते, विजय राजगुरू, संतोष अशोक सातपुते, अक्षय राऊत, जालिंदर सातपुते सुदर्शन भाऊसाहेब पावबाके आदींनी केली आहे.

