काँग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे — आमदार विखे पाटील

पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या ?

आमदार विखे पाटलांना संशय !

प्रतिनिधी —

काँग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे असा सल्ला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या सहा मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होत असलेल्या संभाव्य बदल्यांच्या चर्चेवर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यात बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणार्‍या टेम्पोला लागलेल्या आगीची घटना अतिशय गंभीर असून, प्रश्नपत्रिका जाळल्या की, जळाल्या याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


आमदार विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरती प्रक्रीयेसाठी कोणतीही परिक्षा पारदर्शकपणे होऊ शकलेली नाही. सर्वच परिक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार वारंवार घडल्याने या सरकारच्या काळात सर्वच परिक्षा संशयाच्या भोवर्‍यात अडकल्या.

दहावी-बारावीच्या परिक्षा तोंडावर आल्या असताना प्रश्नपत्रिका घेऊन जाणार्‍या टेम्पोला लागलेल्या आगीची घटना गंभीर आहे. काल परिक्षा महामंडळाने तांत्रिक कारण सांगून पेपरच्या तारखा पुन्हा नव्याने जाहीर करुन टाकल्या. परंतु यातील नेमके तांत्रिक कारण कोणते? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. प्रश्नपत्रिका जळाल्या की, जाळल्या याबाबत कोणताही खुलासा परिक्षा महामंडळ करु शकलेले नाही. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.


एकीकडे कोविड संकटाने सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले आहे. सरकार स्वत:चेच निर्णय मागे घेत राहिले. शाळा सुरु करण्यापासून ते दहावी, बारावीच्या परिक्षांच्या बाबतीतही सरकार ठाम राहिले नाही. आघाडी सरकारचा कारभार पुर्णत: गोंधळलेला असल्याची टिका करुन, सरकारच्या निर्णयातील धरसोड वृत्तीचा विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढवत असल्याचे आमदार विखे पाटील म्हणाले.


केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोपाचा इन्कार आमदार विखे पाटील यांनी केला. ते म्हणाले, केवळ आपले अपयश झाकण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरण उघड होतील अशी भिती असल्यानेच जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे.

आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या सहा मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होत असलेल्या संभाव्य बदल्यांच्या चर्चेवर  विखे पाटील यांनी काँग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असे म्हटले.भ्रष्टाचाराच्या विळख्यात ते अडकले आहेत. मंत्री राहिलो तर संरक्षण मिळेल आणि सत्तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील, अशी भिती त्यांना सतावत असल्यानेच ते होणे शय नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची कोणालाही चिंता नसल्याचा टोला त्यांजळाल्या कि जाळल्या

RRAJA VARAT

One thought on “काँग्रेसला आपली प्रतिमा सुधरायची असेल तर, आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे — आमदार विखे पाटील”
  1. महाविकास आघाडी सरकारनी दोन वर्षं पुर्ण केली.
    अभिनंदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व शरद पवार यांचे.
    विरोधी पक्षाकडे सक्षम नेता नाही व मतदारांना ते कुठल्या सुख सुविधा ते सत्तापालट झाली तर देणार आहेत. विरोधी पक्षात अनेक नेते दिसायला लागले आहेत व सगळे जण फक्त आघाडी सरकार कधी पडेल याच भविष्य सांगत सुटले आहेत. जनतेला थोडी करमणूक फुकटात होते आहे.
    महाविकास आघाडी सरकार विविध वेग वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन केलेले आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपण किती धुतल्या तांदळासारखे आहे म्हणून थोडीफार आपआपसात कुरबुर चालु असते त्यात काही नवल नाही.
    शेवटी जनताच मतपेटीतद्वारे येत्या निवडणुकीत थांबवून देईल. आणि सर्व पक्ष त्या दृष्टीने जनतेला खुश ठेवताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!