आरोग्य विभाग शिवसेनेकडे आहे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील – आमदार अमोल खताळ
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
आमदार नव्हतो तेव्हाही शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयापर्यत पाठपुरावा केला, आता राज्यात महायुती सरकार आहे नगर विकास व आरोग्य विभाग शिवसेनेकडे आहे तुमचे प्रश्न मार्गी लावणे अधिक सोपे झाले आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या यांच्या उपस्थितीत संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वैद्यकीय संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांसमोर असलेल्या प्रश्नांची मांडणी व्यावसायिकांनी केली.
खताळ म्हणाले की, नर्सिंग कायद्याची मोठी अडचण सर्वच वैद्यकीय व्यावसायिका समोर आहे. यापुर्वी निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात असल्याने प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हक्काचे ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यामध्ये आपण निश्चितच प्रयत्न करू. वैद्यकीय व्यावसायिकांवर खोट्या तक्रारी दाखल करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या डाॅक्टरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा उल्लेख करून आमदार खताळ म्हणाले की, यासाठी तुमची एकजूट महत्वाची आहे. मला तुम्ही केव्हाही सांगा जिथे अन्याय होत असेल आपण सहकार्य करू.
याप्रसंगी भाजपाचे श्रीराम गणपुले, संगमनेर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. योगेश गेठे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ एम. डी घुले, डॉ. अशोक इथापे डॉ. नितीन जठार, डॉ. सोमनाथ कानवडे होमिओपॅथिक असोसिएशन अध्यक्ष सुभाष मुंगसे, डॉ. भाऊसाहेब हासे, डॉ. दत्ता जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना वैद्यकीय व्यवसाया पुढील अडचणी आमदार खताळ यांच्यापुढे मांडल्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र कोल्हे यांनी केले, शिवसेना वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संतोष डांगे यांनी सुत्रसंचलन केले, आभार संगमनेर तालुका डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. भरत दिघे यांनी मानले .
