आमदार सत्यजित तांबे यांचा गंगामाई घाटावर नागरिकांशी संवाद
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
प्रवरानदीच्या तीरावर असलेल्या गंगामाई घाटाचे सुशोभीकरण केल्याने संगमनेर शहरासाठी हा परिसर वैभव ठरला आहे .या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ राहत असून आमदार सत्यजित तांबे यांनी येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जेष्ठ व युवकांनी सिटीजन विल पुस्तकाप्रमाणे संगमनेर शहराचा आगामी नियोजन बंद विकास आराखडा असावा याबाबत चर्चा केली.

गंगामाई घाट परिसरामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी शहरातील व्यापारी, डॉक्टर, इंजिनीयर, युवक उद्योजक या सर्वांबरोबर संवाद साधला यावेळी संगमनेर शहरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी हसत खेळत सर्व नागरिकांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याशी संवाद साधताना आमदार तांबे यांनी अनुवादित केलेल्या कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅवीस न्यूसन यांनी लिहिलेल्या सिटीजन विल या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. हे पुस्तक राज्यातील तरुणांसाठी आणि राज्यातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले होते. या पुस्तकामध्ये सुशासनातील नागरिकांचा सार्वजनिक सहभाग यावर दृष्टिकोन टाकण्यात आला असून नागरिक व सरकार यांचे परस्पर संबंध कसे असावे याबाबत सविस्तर उदाहरणांसह लिहिले गेले आहे. नागरिक शास्त्राच्या पारंपारिक अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या लोकशाही शासनापेक्षा फारच वेगळ्या प्रकारच्या लोकशाहीचे प्रतिनिधित करणारे हे पुस्तक आहे.

संगमनेर शहराचा आगामी काळातील नियोजन बद्ध विकास आराखडा कसा असावा याबाबत या पुस्तकाप्रमाणे नक्कीच काम करता येईल असे तांबे यांनी सर्वांना सांगितले.
संगमनेर शहराला एक विकासाची परंपरा आहे. शहर हे एक आपले गाव आहे .आणि या गावाचे गाव पण राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. याकरता प्रत्येकाला राजकारण विरहित एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. आणि त्याकरता सेवा समितीने अत्यंत कार्यक्षम उमेदवार दिले आहेत. असे तांबे यांनी सांगितले.आपल्या सर्वांच्या सूचनांचा कायम आदर करून पुढील प्रशासन काम करेल असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
