इंदिरानगर भागातील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार — आमदार अमोल खताळ 

संगमनेर/ प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक सहा हा तुलनेने मोठा प्रभाग असून याचे नेतृत्व माजी नगराध्यक्षांनी केले आहे. मात्र या भागात भूमिगत गटार, रस्ते अशा मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यातच आरक्षणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषदेची सत्ता महायुतीच्या ताब्यात द्या असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी प्रभाग सहामधील नागरिकांना केले केले आहे.

आमदार खताळ म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून इंदिरानगरमधील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवला जाईल.या प्रभागामध्ये अजूनही, गटारी आणि रस्त्यांचे प्रश्न कायम आहेत. रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे.लहान मुलांसाठी अंगणवाडीची सोय झालेली नाही.महायुती सरकारच्या माध्यमातून नगरपालिका आमच्या ताब्यात दिल्यास भूमिगत गटारी, रस्ते आणि अंगणवाडीचे प्रश्न निश्चित मार्गी लावू. आम्ही नुसत्या पोकळ घोषणा करत नाही; तर जनतेत जाऊन त्यांचे प्रत्यक्ष काम करून दाखवतो म्हणून या प्रभागातील जनता आमच्या पाठीमागे आहे. प्रभाग सहामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!