माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) बैठकांचे आयोजन
संगमनेर (प्रतिनिधी) —
संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये आज बुधवार दि. 26 नोव्हेंबर 25 रोजी संगमनेर शहरांमध्ये विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकार पुढे म्हटले आहे की, संगमनेर नगरपालिकेच्या आगामी होत असलेल्या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीचे सर्व उमेदवार हे सर्व संमतीने निवडले असून शहरांमधून या सर्व उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत आहे याचबरोबर विविध संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. युवक व महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद हे सेवा समितीच्या उमेदवारांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. सर्व उमेदवारांनी शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन आपले व्हिजन समजून सांगत जनतेचा आशीर्वाद घेतला आहे.

संगमनेर सेवा समिती राजकारण विरहित असून आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर 2.0 हे व्हिजन राबवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह 20 नवीन चेहरे व 11 जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग 1 व 2 साठी सायंकाळी 6 वाजता गणेश नगर येथील श्रीराम किराणा येथे, सायंकाळी 7 वा. प्रभाग 2,3,4 साठी जयहिंद सर्कल मालदाड रोड, येथे तर प्रभात 12 व 7 साठी रात्री 8 वा. स्वातंत्र्य चौक येथे व रात्री 9 वा. प्रभाग 10 करता अलकानगर येथे बैठक होणार आहे.

तरी या सर्व बैठकांसाठी प्रभाग एक, दोन, तीन, चार ,13 ,12, 7 व 10 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर सेवा समिती व विविध समाजसेवी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे
