संगमनेरात गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा !

संगमनेर / प्रतिनिधी

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला आणखी वेग देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख नेते एकनाथ शिंदे व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भव्य जाहीर सभा गुरुवारी (ता. २७) दुपारी ३ वाजता नवीन नगर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.

नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. आमदार अमोल खताळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ तसेच सर्व प्रभागांतील महायुतीचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून विकासाभिमुख योजना आणि आगामी नगरपरिषदेचा रोडमॅप मांडत आहेत. प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क, पदयात्रा आणि विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रचार मोहीमेतील महायुतीची दिशा, विकासाची भूमिका आणि शहराच्या भविष्यासाठी आखलेली रूपरेषा प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची जाहीर सभा ही महायुतीसाठी ‘उर्जेचा नवा स्त्रोत’ ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवारांना मोठा आत्मविश्वास मिळेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. या सभेसाठी शिवसेना महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या जाहीर सभेसाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!