विरोधकांवर आरोप प्रत्यारोप बंद करून पाच वर्षात काय केलं हे सांगणे गरजेचे -= डॉ. सुजय विखे
निमोन येथील कार्यक्रमात महायुतीच्या कार्यकर्त्यांना सल्ला
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यात झालेले परिवर्तन खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी टिकवायचे असेल आणि जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल तर विरोधकांवर आरोप प्रत्यारोप बंद करा. मागील ४० वर्षात काही करून दाखवलं नाही, ते आम्ही ५ वर्षात करून दाखवलं हे तुम्ही जेव्हा जनतेकडे मतदान मागण्यासाठी जाताल तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल. असा सल्ला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला.

आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांच्या संकल्पनेतून अहिल्या नगर जिल्ह्यात एकमेव असलेल्या १५१ फुटी उंचीवर ६० बाय २० लांबीचा असणाऱ्या राष्ट्रध्वजाचे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. सुजय विखे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या शुभहस्ते रिमोटचे बटन दाबून लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विखे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदारा अमोल खताळ, सरपंच संदीप देशमुख, उपसरपंच रवींद्र गाडेकर, भाजप ज्येष्ठ नेते सुदाम सानप मारुती घुगे, प्रकाश सानप, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, संकेत घुगे, संतोष घुगे, मुस्तकीन शेख, सोपान मंडलिक, प्रवीण घुगे, मोहिनी मोकळ, साहेबराव घुगे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले की, आज आपण सत्तेवर आहोत. जनतेने तालुक्यात परिवर्तन केले आहे. त्यामुळे सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. कोणीकाही म्हणू त्याच्याकडे दुर्लक्ष करत येथूनपुढील काळात फक्त जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे. संपूर्ण तालुक्यात झालेल्या परिवर्तचा एक अविस्मरणीय क्षणअसला तरी या परिवर्तनामुळे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आली आहे. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना या सत्तेच्या माध्य मातून न्याय देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.

त्यामुळे तुम्हाला वाटत असेल अमोल खताळ बदलले मात्र आमदार झाल्यानंत त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढलेली आहे. आमदार खताळ हे बदलले नाहीत, तर त्यांच्या कडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला आहे. तुम्ही त्यांना आता निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना आता पाच वर्ष काम करण्यास मोकळीक द्या. निमोण गावात ध्वज हा असा तसा बसला नाही तर सरपंच संदीप देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्णविखे पाटील यांच्या मागे लागून 45 लाख रुपये मंजूर करून घेतले तेव्हा हा ध्वज उभा राहिला आहे.

भोजापूर चारीचे पाणी या भागाला मिळालेच पाहिजे ही मागणी या भागातील जनतेने आमच्याकडे केली. आमदार खताळ यांनी निवेदन देऊन त्यासाठी प्रयत्न केले आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या चारीच्या विस्तारी करणासाठी 25 कोटी रुपये मंजूर करून पुढील महिन्यात या चारीचे भूमिपूजन आपण करणार आहोत. या चारीची वाहन क्षमता 80 किंवा शंभर क्युसेक असली पाहिजे परंतु ती अगोदरच 30 ने वाहत असेल तर निमोण सोनोशी नान्नज तिगांवला पाणी कसे मिळणार ? याचा दुर्दैवाने या अगोदर अभ्यास कधीच झाला नाही.

सर्वप्रथम ही भोजापुर चारी जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आली आणि 2014 ते 24 या दहा वर्षाच्या कालावधी मध्ये या चारीसाठी ४ कोटी रुपये खर्च करण्यात आला. परंतु या चारीने या भागाला पाणी देण्याचे काम विखे पाटील परिवार करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच शब्द देतो या भोजापूर चारीसाठी 25 कोटी रुपये खर्च करून दुरुस्त केल्या नंतरच तुमच्याकडे मते मागायला येईल. असा शब्द देत ते म्हणाले की, या चारी साठी कितीही पैसा लागू तो मिळवून देणार आणि या चारीचे पाणी या दुष्काळी भागातील जनतेला मिळूनच देणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
