सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगमनेर कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व रस्त्यांची दुर्दशा..
संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 21
संगमनेर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

तालुक्यातील बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व रस्त्यांची खूप वाईट अवस्था झालेली आहे. त्या सर्व रस्त्यांची कामे उत्तम प्रकारे का केली जात नाहीत असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला असून पुढे म्हटले आहे की,

रस्त्याची कामे केल्यानंतर ते रस्ते सहा महिन्याच्या कालावधीत लगेव खराब कसे काय होतात, खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. जनतेला असुरक्षित जीवन जगावे लागत आहे. जीव मुठीत धरून त्या रस्त्यावर प्रवास करावा लागतो आहे. याचे गांभीर्य प्रशासनास कधी कळणार की नाही ?
प्रत्येक वर्षी रस्त्याची दुरुस्ती करून जनतेचा पैसा सरकार वाया घालवत आहे. एकदाच उत्तम प्रकारचा रस्ता तयार करावा की, तो दीर्घकाळापर्यंत टिकेल व जनतेचा Tax रुपी पैसाही वाया जाणार नाही. लोकशाही देशात जनतेकडून Tax घेतला जातो परंतु त्या प्रमाणात जनतेला शासन व प्रशासन यांच्याकडून योग्य सुविधा मिळत नाहीत.

जर आपल्या कार्यक्षेत्रात असलेले रस्ते लवकरात लवकर उत्तम प्रकारे दुरुस्त झाले नाही व या नादुरुस्त रस्त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनाला थोडा जरी धोका निर्माण झाला तर त्या गोष्टीला सर्वस्वी प्रशासन म्हणून आपण जबाबदार राहणार आहात.
या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनतेला उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कामास विलंब होऊन जर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास रस्त्यावर बसून आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदनावर अध्यक्ष राम अरगडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
