पालघर ते मंत्रालय बिऱ्हाड मोर्चा !
आदिवासी पेसा कर्मचाऱ्यांची वारी मुख्यमंत्र्यांच्या दारी !! लॉन्ग मार्च…
बिरसा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहिल्यानगर प्रतिनिधी दिनांक 4 —
आदिवासी संवर्गातील पेसा मानधन तत्वावरील उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी या मागणीसाठी पेसा कर्मचारी कृती समिती, बिरसा ब्रिगेड यांच्यावतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले असून पालघर ते मंत्रालयअसा बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे.

आदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य व आदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी कृती समिती अहिल्यानगर, बिरसा ब्रिगेड संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच पेसा मानधन तत्वावरील उमेदवार यांना पर्मनंट नियुक्ती मिळण्यासाठी. दि. ७ जुलै २०२५ रोजी पालघर ते मंत्रालय बिऱ्हाड लॉंग मार्च काढण्यात येणार आहे असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदन देण्यासाठीआदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यचे अहिल्यानगर पदाधिकारी संदीप आंबेकर, बिरसा ब्रिगेड संघटनेचे पंढरीनाथ खाडे, आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर या संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे, आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर या संघटनेचे उपाध्यक्ष हिरामण पोपेरे, कृती समितीचे प्रणिता आंबेकर, स्वप्नील भांगरे, वैभव डगळे, अक्षय बांबळे, राजेंद्र घिगे उपस्थित होते.
