अमृतवाहिनी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयास युजीसीकडून “स्वायत्त दर्जा”

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 18

येथील अमृतवाहिनी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून दहा वर्षा करिता म्हणजे २०२५-२०३५ पर्यत “स्वायत्त संस्था” (आटोनोमस) म्हणून नुकतीच मान्यता बहाल करण्यात आली आहे. या मान्यतेमुळे शैक्षनणीक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबतीत अधिक स्वायत्तता प्राप्त झाली असून अभ्यासक्रम रचना, परीक्षा आयोजन, संशोधन क्षेत्रात नवकल्पनांची अंमलबजावणी अशा विविध स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जे. चव्हाण यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.चव्हाण म्हणाले महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व  माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालयाने गुणवत्तेमुळे देशात आपला लौकिक वाढवला आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्ता पूर्ण कामकाजामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या महाविद्यालयात स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे.

या स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक ठरणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती अमलांत आणता येणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी नव्या दिशा खुल्या झाल्या आहेत. २००४ साली स्थापन झालेल्या महाविद्यालयाने शैक्षनणीक व संशोधन शेत्रात भरीव कामगिरी केली आहे. महाविद्यालयास NAAC कडून A मानांकन, तसेच UGCकडून २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता प्राप्त झाली आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधायुक्त सक्षम प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. महाविद्यालायाने कम्पस व प्लेसमेंट क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक युगातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, नाविन्य व उद्योजकता विकास कक्ष, एकात्मिक व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम, आर्थिक साक्षरता सत्रे तसेच नवीन तंत्रज्ञान कौशल्याधीष्टीत उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक सामाजिक आणि व्यावसाईक विकास साधला जात असून, त्यांचा रोजगारक्षम व आत्मनिर्भर बनविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न महाविद्यालयातर्फे केला जात आहे.

या यशाबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व अकेडेमिक डायरेक्टर डॉ.जे.बी. गुरव यांनी आनंद व्यक्त केला. तसेच पुढील वाटचालीस महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या.

“ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. शैक्षणीक गुणवत्ता, संशोधन, आणि कौशल्य विकास या क्षेत्रात नवीन उपक्रमांना चालना देण्याची हि संधी आहे. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी ही शैक्षणीक स्वायत्ता अत्यंत मोलाची ठरणार आहे. शरयु देशमुख (कार्यकारी विश्वस्त)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!