संगमनेरमध्ये कला-क्रीडा महोत्सव घेणार – आमदार खताळ
वडगाव लांडगा व चिखली येथे शालेय साहित्य व गणवेश वाटप
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 17
प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही कौशल्य असते, त्यास योग्य संधी दिली तर तेच सरकारी अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, खेळाडू वा कलाकार बनू शकतील त्यासाठी त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी तालुका स्तरीय कलाा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी वडगाव लांडगा येथे केली.

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शाळेतील नवागत विद्यार्थ्यांची पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात आणि लेझीमच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी स्वतः काही काळ ट्रॅक्टर चालवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणधिकारी बाळासाहेब गुंड, केंद्र प्रमुख बाळासाहेब जाधव, मुख्याध्यापिका मुक्ता शिंदे, सरपंच दत्तात्रय रोकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन रोकडे, उपाध्यक्ष अंजन कुमार लांडगे, चांगदेव लांडगे, अरुण लांडगे, सुरेश लांडगे, दत्तात्रय लांडगे, राजाराम लांडगे, संतोष हांडे, नवनाथ बोऱ्हाडे, रमेश मोरे, तुषार वाकचौरे, सिताराम मोरे, मच्छिंद्र लांडगे, विठ्ठल शेळके, नवनाथ डोंगरे, गोरख लांडगे, बाळासाहेब लांडगे, गोरख बोऱ्हाडे, धनु मालुंजकर, संकेत बोऱ्हाडे, सोमनाथ कोठवळ, धनु लांडगे यांच्या सह जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, वडगाव लांडगा शाळेने कायमच आपली गुणवत्ता जपली आहे म्हणून आज या शाळेतील अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षणाचा पहिला दिवस हा केवळ शाळा सुरू होण्याचा दिवस नसून तो विद्यार्थ्यांच्या आनंदाचा दिवस असतो..शासनाकडून शालेय साहित्य, गणवेश, मध्यान्ह भोजन, आरोग्यसेवा मोफत दिली जात आहे. मात्र या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता शिंदे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला, तर शिक्षक हरिभाऊ करकंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्त हार-तुरे वा पुष्पगुच्छ न आणताविद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य द्यावे, असे आवाहन आ. अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार गोळा झालेल्या वह्या व साहित्याचे वाटप वडगाव लांडगा येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले. उर्वरित सर्व साहित्य तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवले जाणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
