नगरपालिकेच्या उद्यानांमध्ये चालतात अवैध धंदे !
संगमनेर शहरातील समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा आंदोलन ; काँग्रेसचा इशारा
मुख्याधिकाऱ्यांना शिष्टमंडळाचे निवेदन
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 15
मात्र मागील 3 वर्षापासून संगमनेर नगर परिषदेवर प्रशासक असून विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने अनेक शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरांमध्ये नागरिकांचा रोष वाढत असून तातडीने या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी काँग्रेसने निवेदन दिले असून 15 दिवसात समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, निखिल पापडेजा, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, अरुण गावित्रे, मुस्ताक शेख, शेख अहमद, प्रकाश कडलग, मनोज कुमार गंगवाल, सुभाष सानप, ॲड. अशोक हजारे, सचिन खेमनर, अमित गुंजाळ, ॲड. सुहास आहेर, सुमित पवार, शशिकांत पवार, सतीश शिंदे, सुभाष दिघे, अंबादास आडेप, विशाल निळे, ललित शिंदे, सुरेश झावरे, विजय पवार, ललित शिंदे, श्रीकांत सांगळे, संतोष मुर्तडक, शब्बीरभाई बोहरी, अरुण हिरे, सौरभ उमरजी, प्रमोद कडलग, प्रमोद गणोरे, सौदामिनी कान्होरे, सुषमा भालेराव, शिवांजली गाडे, सुनीता कांदळकर आदी उपस्थित होते.


या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यापूर्वी शहरातील नाटकीनाल्यासह उपनद्या साफ कराव्यात, भुयारी गटारी योजनेचे काम तातडीने मार्गी लावावे, शहरातील उद्याने साफ करावीत व तेथे चालणारे अवैध धंदे व गैरवापर करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, ज्या स्ट्रीट लाईट बंद असतील त्या तातडीने चालू कराव्यात, विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या व वाढीव झाडांची कटिंग करावी, ज्या कामांच्या निविदा निघून वर्क ऑर्डर दिलेले आहेत ती कामे त्वरित चालू करावी, मोडकळीस आलेल्या इमारतींना पूर्व सूचना देऊन त्या काढून घ्याव्यात, म्हाळुंगी नदीच्या पुलाला पावसाळ्या अगोदर कठडे बसवावेत, मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा, सुलभ शौचालय, युरिनल स्वच्छता करावी, रस्त्यांना खड्डे पडले असून ते तातडीने बुजवावेत, ज्या कामांची प्रशासकीय मान्यता झाली आहे त्या कामांची निविदा काढावी, अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावी, जुन्या गावठाणात वापरात नसलेले लाईट पोल काढून घ्यावेत व पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

नगरपालिका प्रशासनाने पुढील पंधरा दिवसात या मागण्या पूर्ण कराव्यात, तातडीने कार्यवाही करावी असे न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

अपंगांचा निधी प्रलंबित आहे व अपंगांची संख्या वाढत चालली असून तो प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संगमनेर शहरात सुंदर 40 गार्डन निर्माण केले आहेत. मात्र त्याची आता दुरावस्था झाली आहे. गार्डन मधील लहान मुलांचे खेळण्याची साहित्य मोडकळीस आले आहे. संगमनेर शहराची स्वच्छता आणि सौंदर्य बिघडवण्याचे काम सुरू आहे ते थांबवले पाहिजे असे दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे.
