संगमनेरकरांनो रात्री घराबाहेर ओट्यावर सावध झोपा…

चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे 

संगमनेर प्रतिनिधी दि. 26

घरफोड्या, अवैध धंदे त्याचबरोबर चोरीच्या घटना देखील संगमनेर शहर हद्दीत वाढू लागल्या आहेत. शहरापासून जवळच असलेल्या घुलेवाडी येथे उन्हाळ्याच्या रात्री गरम होते म्हणून घराच्या बाहेर ओट्यावर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोने चोरून नेण्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता घराच्या ओट्यावर झोपतानाही सावधपणे झोपायला हवे. चोरटे एकही संधी सोडायला तयार नसून पोलिसांची रात्रीची कामगिरी कशी चालू आहे हे देखील उघड होत आहे.

सुगंधा सुदाम राऊत (वय ७०) महात्मा फुले विद्यालय जवळ, घुलेवाडी, तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून रात्री जेवण केल्यानंतर पतीसह घराचे बाहेर ओट्यावर झोपलेले असताना गाढ झोपेत असता माझ्या गळ्यातील मंगळसूत्र व डोरले चोरून नेल्याचे आढळून आले. पहाटे लक्षात आल्यावर माझ्या अंथरुणात मंगळसूत्राचे काळे मणी पडलेले आढळून आले.. दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि तीन ग्रॅम वजनाचे डोरले चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

त्यामुळे रात्रीच्या वेळी ओट्यावर झोपताना सावध झोपायला हवे. अर्थात ओट्यावर झोपल्यावर चोरटे त्याचा गैरफायदा घेऊन घरात घुसून चोरी करू शकतात. त्यामुळे आता जनतेनेच सावधपणे आपापल्या मालमत्तांचे रक्षण करायला हवे. पोलिसांवरचा भरोसा आणि विश्वास डळमळीत होत चालला असल्याचे चित्र आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!