“कैलास पर्वत व मानस सरोवर.. मिश्र संस्कृतीचे दीपस्तंभ”
पुस्तकाचे ९ जानेवारीला संगमनेरला प्रकाशन
संगमनेर दि. 7
ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते प्रा. शिवाजी गायकवाड यांनी कैलास पर्वत मानस सरोवर पायी परीक्रमा केली. या अनुभवावर आधारीत त्यांनी लिहिलेल्या ‘कैलास पर्वत व मानस सरोवर मिश्र संस्कृतीचे दीपस्तंभ’ या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ९ जानेवारी, गुरूवारी संध्याकाळी ५ वाजता, व्यापारी असोसिएशन कार्यालय, पडतानी कॉम्प्लेक्स, जोशी हॉटेल शेजारी या सभागृहात ज्येष्ठ लेखक अक्षर दिवाळी अंकाचे सम्पादक हेमंत कर्णिक यांच्या हस्ते होणारं आहे.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे संस्कृतचे प्राध्यापक आणि सिंघम, सुपर ३०, पानिपत या हिंदी चित्रपटातील गीतांचे गीतकार प्रा. हेमंत राज्योपाध्ये तसेच मैत्री प्रकाशनाच्या मोहिनी कारंडे प्रमुख पाहुणे असणार आहेत. नाशिक मुस्लिम कारखानदार आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मिनाजबेग रफिकबेग मिर्झा प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तरी संगमनेरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. निशा शिवूरकर, सीमा मालाणी, ॲड. मीनल देशमुख, डॉ. अमित शिंदे, शांताराम गोसावी, ॲड. वनिता साबळे, ॲड. अनिल शिंदे, विनोद भोईर, मंगला भावसार इत्यादींनी केले आहे.
