अमळनेरच्या साहित्य संमेलनात संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकाचे होणार प्रकाशन

प्रतिनिधी —

संगमनेर येथील पत्रकार व शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी लिहिलेल्या शिक्षणाचे परिवर्तन व विनोबांची शिक्षण छाया या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. सदरची दोन्ही पुस्तके अमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती चपराक प्रकाशाचे प्रमुख पत्रकार घनश्याम पाटील यांनी दिली.

प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या परिवर्तनाची वाट या पुस्तकाला महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे. विनोबांची शिक्षण छाया या पुस्तकाला संपादक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार जे.डी .पराडकर, सामाजिक कार्यकर्ते मयूर बागुल व श्री पाटील यांच्या सह महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

वाकचौरे यांचे चपराक प्रकाशाच्या वतीने शिक्षण विषया संदर्भाने 12 पुस्तकांचा संग्रह प्रकाशित केला जाणार आहेत. यापूर्वी शिक्षणाचे दिवा स्वप्न, शिक्षणाचे पसायदान, पाटी पेन्सिल, ऐसपैस शिक्षण ही पुस्तके ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे. वाकचौरे हे महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये सातत्याने शिक्षण विषयक स्तंभलेखन करत आहे. त्यांची आजवर दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकाला यापूर्वी सामाजिक व साहित्य संस्थेच्याद्वारे पुरस्कार मिळाले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!