लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्नेहसंवाद मेळावा

संगमनेर दि. 2

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वा. यशोधन शेजारील ग्राउंडवर कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

डॉ.तांबे म्हणाले की, विधानसभेचा एकूण राज्यातील आणि संगमनेर तालुक्याचा निकाल हा अनाकलनीय व अनपेक्षित आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली आहे. राज्यभरामध्येही हीच परिस्थिती आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या कामातून संगमनेर तालुका उभा केला आहे. सुसंस्कृत राजकारणाची पद्धत निर्माण केली आहे. तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. प्रत्येक गावात वाडीवस्तीवर विकासाची काम केले आहे.

याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण करून दुष्काळी भागातील जनतेला पाणी दिले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ऐतिहासिक ठेवा ठरला असून संगमनेर शहरात हायटेक बस स्थानक, विविध वैभवशाली इमारती,बायपास व तालुक्यात अनेक मोठमोठे विकासाची कामे केली आहे. याचबरोबर ग्रामीण विकासातून प्रगती साधताना तालुक्याची बाजारपेठ समृद्ध केली आहे. तालुका हा परिवार मानून प्रत्येकाच्या सु:ख दुःखात ते नेहमी सहभागी झाले आहेत.

विधानसभेच्या अनपेक्षित निकालाने तालुका हळहळला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता यशोधन जवळील ग्राउंडवर तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी संगमनेर तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यभरातूनही अनेक मान्यवर येणार आहेत.

तरी मंगळवारी दुपारी 3 वाजता होत असलेल्या या स्नेहसंवाद मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिक बंधू – भगिनी व युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी, महाविकास आघाडी, लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळ, व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

Oplus_131072

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!