संगमनेरात धक्कादायक निकाल !
शिवसेनेचे अमोल खताळ विजयी !!
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव
प्रतिनिधी —
संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचे धक्कादायक निकाल लागत असतानाच संगमनेर विधानसभेत देखील माजी महसूल मंत्री आणि सलग आठ वेळा आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांचा खूपच धक्कादायकरीत्या पराभव झाला असून अगदी नवख्या युवक असणाऱ्या शिवसेनेचे (शिंदे गट) अमोल खताळ पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे.

मतांनी खताळ विजयी झाले आहेत. खताळ पाटील हे जायंट किलर ठरले असून थोरात यांचा पराभव काँग्रेस पक्षासाठी धक्कादायक असला तरी संगमनेर करांनी केलेले परिवर्तन देखील विचार करायला लावणारे आहे.

आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून अमोल खताळ यांनी आघाडी घेतली होती, ती शेवटच्या फेरीपर्यंत टिकून राहिली. अनेक वेळा थोरात यांच्या कार्यकर्त्यांना असे वाटत होते की काही ठिकाणी खताळ यांना लीड मिळेल मात्र इतर ठिकाणाहून थोरात हे मोठा लीड घेऊन निवडून येतील मात्र तसे न होता सातत्याने खताळ हे मताधिक्य मिळवत राहिल्याने अखेर ते विजयी झाले आहेत.

एक लाख मतांनी विजयी होण्याचे स्वप्न भंगले !
बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाला देखील थोरात हे एक लाख मतांपक्षा पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली असून मतदारांनी खताळ यांना कौल दिल्याने एक लाख मतांनी निवडून येण्याचे स्वप्न हवेतच विरले असल्याचे बोलले जात आहे. थोरात यांचा पराभव हा थोरात यांनाच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरेल.

