खताळ आडनावाचा वापर करून गैरप्रकार करणे चुकीचे – विक्रमसिंह खताळ पाटील
त्यांच्याकडून सत्तेच्या माध्यमातून फक्त सेटलमेंटचे उद्योग…
प्रतिनिधी —
स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांचे सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र या आडनावाचा वापर करून समोरील व्यक्ती प्रशासनावर दबाव निर्माण करत आहे. पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून होत असलेली सेटलमेंट हा काय प्रकार सुरू आहे ? असा सवाल करतानाच भाजपकडून संगमनेर तालुक्यात सुरू झालेली धाक व दडपशाही निंदनीय असल्याची टीका संगमनेर विधानससभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारावर काँग्रेस पक्षाचे तत्त्वनिष्ठ राजकारणी, माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांचे नातू युवानेते विक्रमसिंह खताळ पाटील यांनी केली आहे.

हॉटेल सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी समवेत त्यांच्या सुविध पत्नी शिवांगी खताळ उपस्थित होत्या .

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या अनेक कारस्थानाबाबत नाराजी व्यक्त करताना खताळ म्हणाले की, महसूलच्या अनेक कामांची बंदी असताना एका विशिष्ट कुटुंबासाठी नियम शिथिल करणे. महसूल अधिकारी यांच्यावर सातत्याने दबाव टकाने. जमिनीचे व्यवहार, तलाठी भरती मध्ये अनेकांकडून पैसे घेतले मात्र ते परतही केले गेले नाही. असे अनेक उद्योग फक्त खताळ आडनाव वापरून या मंडळीने केले आहे. हे दुर्दैवी आहे.

संगमनेर तालुका हा शांत व सुसंस्कृत विचारांचा आहे .मात्र येथे आता भाजपकडून दडपशाही निर्माण केली जात आहे. बीजे खताळ साहेबांचा काँग्रेसचा विचार होता. मात्र समोरचा उमेदवार हा दर सहा महिन्याला पक्ष आणि विचार बदलत आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ?

त्यांचे अनेक गैरप्रकार आहेत. ते सर्व माध्यमांनी बाहेर काढावे. कोण खरा आहे कोण खोटा आहे हे सर्वांना माहिती आहे. व्यक्तिगत पातळीवर टीका करणारे राजकारण आपल्याला पटत नाही असे सांगताना यापुढील काळात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून ते जी जबाबदारी देतील ती आपण पार पाडणार आहोत.

धांदरफळ गट आणि तालुक्यातील जनता यांच्यामध्ये धांदरफळ घटनेमुळे तीव्र संताप निर्माण झाला. या घटने वेळी वसंत देशमुख यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुढे बोलतच राहिले. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मानच झाला पाहिजे आणि ती परंपरा थोरात आणि खताळ परिवाराने नेहमी जपली आहे.

मात्र भाजप महायुतीकडून इतक्या खालच्या पातळीचे राजकारण जर कोणी करत असेल तर ती आपली संस्कृती नाही. आणि त्यामुळे मी धांदरफळ घटनेचा निषेध करतोच. मात्र त्यांना समर्थन करणाऱ्या जेवढ्या प्रवृत्ती आहे त्यांचाही निषेध करतो. विकासाच्या वाटचालीमध्ये सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे असल्याचेही ते म्हणाले.
खंडणीखोरीला आणि चुकीच्या कामांना पाठिंबा नाही…
दडपशाही आणि दबावशाहीच्या राजकारणामुळे व्यतीत झालेले आणि असे हुकूमशाहीचे विचार न पटल्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले विक्रम सिंह खताळ पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षात सत्ता आल्यानंतर महायुतीच्या सत्तेच्या माध्यमातून त्यांचे तालुक्यातील गैर प्रकारांचे अनेक किस्से आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. खंडणीखोरीचे काम कोणी करत असेल तर ते चुकीचे असून अशा चुकीच्या कामांना आमचा कधीही पाठिंबा नाही. अनेक ठिकाणी केलेली अशी कामे माध्यमाने चव्हाट्यावर आणावीत आणि सत्य सामान्य जनता आणि मतदारांसमोर आणावे.

