किशोर कालडा यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ५० वर्षांची यशस्वी कारकीर्द….
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !
प्रतिनिधि–
क्रिडा क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय कारकीर्द ५० वर्षे यशस्वीपणे पार पाडणारे किशोर कालडा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सर्व प्रकारच्या सामाजिक कार्याबरोबरच राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात यशस्वीपणे ५० वर्षाची कारकीर्द पूर्ण करणारे संगमनेर चे माजी नगरसेवक किशोर कालडा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पन्नास वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, पत्रकारिता, राष्ट्रभक्ती, व्यापारिक, कृषी पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य, क्रीडा आशा सर्वव्यापी क्षेत्रात संगमनेर ते दिल्ली व प्रसंगी विदेशातही आपले कर्तुत्व सिद्ध करून आपले नाणे खणखणीत वाजविणारे संगमनेर चे सुपुत्र किशोर कालडा यांच्या या कारकीर्दीचा कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
जवळजवळ पन्नास पेक्षा अधिक सामाजिक संस्थांवर काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

आपल्या आतापर्यंतच्या जीवनात त्यांना असंख्य देशी व इंटरनॅशनल सन्मानपत्र मिळाली आहेत.
संगमनेर नगरपालिकेच्या राजकारणात मिस्टर क्लीन म्हणून ओळखले जाणारे किशोर काडला हे नगरपालिकेतील पहिले व्हाईस प्रेसिडेंट आहेत. पत्रकारितेतील संपादक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद होण्याचे मानकरी ठरले आहेत.
संगमनेर नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये कधीही कोणताच शासकीय आर्थिक लाभ त्यांनी स्वत: साठी घेतला नसल्याची नोंद आहे. मिळणारे आर्थिक लाभ आणि कामकाजाचा सर्व भत्ता त्यांनी सेवाभावी संस्थाना मदत म्हणून दिला.

तसेच जोपर्यंत संगमनेर मधील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत मी सभाग्रहात पाणी पिणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती ती त्यांनी पाळली.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांची ही सर्व पदे लिहायची ठरली तर कागद पुरणार नाही. या त्यांच्या या जगावेगळ्या कर्तुत्वाची दखल घेऊन लंडन येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची नोंद करण्यात आली आहे.
अशा या ५० वर्षाच्या कार्यकर्त्याची पूर्तता करणाऱ्या किशोर कालडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
