कोपरगाव आगाराच्या शिवशाही बसची दुर्दशा रस्त्यावर !

प्रतिनिधी —

प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळ विविध प्रकारची वाहने रस्त्यावर आणत आहे. यासाठी प्रवासासाठी  मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मोबदलाही प्रवाशांच्या कडून घेतला जातो. मात्र अतिरिक्त पैसा मोजूनही प्रवाशांच्या पदरात अस्वच्छता, असुविधाच पदरी पडत आहेत.

कोपरगाव आगाराच्या शिवशाही बसने ही दुर्दशा थेट रस्त्यावर आणली आहे. त्यामुळे अशा असुविधेच्या आणि अस्वच्छ बसेस प्रवाशांच्या पदरी टाकण्यापेक्षा एसटीने कारभार सुधारणा करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

कोपरगाव आगाराची एम. एच. 06 बी डब्ल्यू 0114 ही शिवशाही बसेस पुण्यावरून  कोपरगाव कडे जाण्याचा निघाली होती. (18/5/2024) बस एसी शिवशाही आहे असे म्हटल्यावर उन्हाळ्याच्या तापत्या वातावरणात अनेकांनी साध्या बस ऐवजी या बसला प्राधान्य दिले, मात्र गाडी मध्ये बसल्यानंतर आणि प्रवास सुरू झाल्यानंतर या बसेस मध्ये अस्वच्छता प्रवाशांच्या नजरेत भरली. प्रवासी सिटवर अनेक ठिकाणी धूळ, डाग पडलेले अस्वच्छ असल्याचे दिसून येत होते. बस मध्ये असलेले पडदेही गेले कित्येक वर्ष धुतले आहेत की नाही असा प्रश्न प्रवाशांना पडला होता.

बस साठी खिडक्यांना चारी बाजूने काचेची सुविधा देण्यात आली आहे. मात्र यातील डाव्या बाजूला दोन काचा पूर्णतः निखाळलेला होत्या. त्या जागेवरती जुगाड करत चक्क पत्रे ठोकण्यात आले होते. त्या पत्र्यांना अनेक ठिकाणी करंगळी एवढे छिद्र असल्याने बाहेरील गरम हवा आत येत होती. बस ए.सी सुविधा सेवा देत असल्याने त्यासाठी प्रवाशांच्या मस्तकावर असलेल्या छतावर एसीची थंड हवा घेण्यासाठी दोन पॉईंट देण्यात आलेले आहेत, मात्र बसेस मधल्या सर्व पॉईंटची अत्यंत दुर्दशा  झालेली दिसून आली. त्यामुळे एसीची गरज नाही, अथवा हवा कमी करायची असेल, दिशा बदलायची असेल तर ती सुविधा या खराब झालेल्या पॉईंटमुळे प्रवाशांना घेत आली नाही.

पुणे कोपरगाव प्रसादरम्यान काही ठिकाणी पाऊस झाल्याने त्या पावसाचे पाणीही बस मधून टपकत असल्याचेही दिसून आले. बस मध्ये असलेले सीट इतके अस्वच्छ होते की, त्या सीटवर बसण्याचा धाडसही प्रवासी करू शकत नव्हते. मात्र पर्याय नाही म्हणून अनेकांनी त्यावर बसने पसंत केले.

पुणे संगमनेर साध्या बस प्रवासासाठी प्रवाशांना 210 रुपये तिकीट दर द्यावे लागतात तरीही उत्तम सेवा देणारी बसेस म्हणून या बसला प्रवासी 310 देत असतात. अतिरिक्त शंभर रुपये मोजूनही साध्या बस पेक्षाही अत्यंत खराब सुविधा या बस मध्ये उपलब्ध होत असेल तर हा अतिरिक्त पैसा मोजायचा कशाला असा प्रश्न  प्रवाशांना पडला होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!