शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लिहिण्यात आलेले एक पत्र सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे…

साहेब
तुम्ही मुख्यमंत्री झालात
समोर कोविडचा काळ उभा राहीला
तुम्ही डगमगला नाहीत
हे महाराष्ट्राच भाग्य होतं
तुमचं महामारीतल नियोजन
उत्तम नेतृत्व….
संत प्रवृत्तीची शांत वाणी
ह्या वाणीच्या ओव्या झाल्या साहेब
थांबलेल्या संसाराला बळ आलं
महामारीत जग थांबलं होतं
पण तुम्ही थांबला नाहीत
रोज सकाळी टिव्हीवरच तुमचं बोलणं
आम्हा गरीबांना केवढा आधार होता साहेब
त्या बोलण्यात माया होती,
धाक होता, काळजी होती
तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री नाही
तर…..
प्रत्येक घरातले पालक झाला होतात
मास्क नाही तर राशन नाही,
सतर्क रहा…सुरक्षित रहा
साहेब आदरयुक्त भिंती होती तुमची
जगण्याचा ऑक्सिजन देत राहीलात
साहेब….
खरंच तेव्हा जगण्याच बळ दिलत
परप्रांतीयांना धीर दिलात
त्यांना मायेचा हात दिलात
त्यांच्या परतीसाठी गाड्यांची सोय केली
भुकेल्यासाठी शिवठाळी सुरू केलीत
तुम्ही शिवठाळी सुरू करून
हा महामारीचा शिवधनुष्य पेललात
साहेब खरं सांगू
त्या महामारीच्या दोन वर्षात
आपण सगळे
जातीपातीच्या पलिकडे जाऊन जगलो
मंदीर बंद होती साहेब
पण आमचा देव
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे
रोज सकाळी टिव्हीवर प्रकट होत होता
महामारी विरोधी लढत होतात
सिंधुताई सपकाळ गरीबांची माय
त्या मायेनं फोन करून तुमचं कौतुक केलं
ह्या पेक्षा मोठा अवॉर्ड काय हवं साहेब
हजारो गोरगरीब जनतेचे आशिर्वाद
साहेब तुमच्या पाठीशी आहेत.
महामारीत आम्हाला खचू दिल नाहीत
दुर्गाभवानीची शपथ घेऊन सांगतो
हा तुमचा शिवमावळा
तुम्हाला खचू देणार नाही
तुम्ही अहींसेने लढाई लढत आहात
एवढं पुरेसं आहे आम्हाला
आणि अहिंसा कधी हरत नाही
ह्याला इतिहास साक्ष आहे
वाजुन दे तुतारी ढोलताशे
साहेब…….
विजय आपलाच आहे…..
पेटत्या मशालीला
काजव्याच्या उजेडाची भिंती कशाला.
भ्रष्ट काजव्यांनो या तलवारी घेऊन
हींदू हृदय बाळासाहेब ठाकरेचा मावळा उभा आहे
हाती धगधगती मशाल घेऊन
हरहर महादेव……
रॉबीन लोपीस
9890031225
