बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तरुणाची आमदार थोरात यांनी घेतली भेट

प्रतिनिधी — 

जांबुत खुर्द येथील शिवाजी बबन पारधी हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात रविवारी गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला तातडीने संगमनेर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यंत व्यस्त दिनक्रम व निवडणुकीची धामधूम असतानाही सर्वसामान्यप्रति कायम आपुलकी व जिव्हाळा असलेले लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने दवाखान्यात जाऊन या तरुणाची भेट घेऊन मदतीच्या सर्व सूचना दिल्या.

जांबुत खुर्द गावातील वाडा वस्ती येथील शिवाजी पारधी हा तरुण शेतकरी आपल्या शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. यामध्ये त्याच्या उजव्या खांद्याला, छाती, पोट आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. यावेळी गावातील नागरिकांनी तातडीने त्यांना औषध उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे उपचार सुरू असताना ही बातमी कळताच आमदार बाळासाहेब थोरात व डॉ.जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन या तरुणाची भेट घेत चौकशी केली. यावेळी समवेत सभापती शंकर  खेमनर, मीरा शेटे, उपसरपंच सुभाष डोंगरे व पदाधिकारी होते.

जखमी तरुणाला मदतीच्या सर्व सूचना आमदार थोरात यांनी देत पुढील उपचारासाठी एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!