पठार भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच ;  

आता शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारींची चोरी

शेततळ्यातील इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार चोरून पोबारा!

यापूर्वीही मोटार चोरीच्या घडल्यात घटना 


प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंडेरायवाडी येथील एका शेतकर्‍याच्या शेततळ्यातील इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार चोरून चोरट्याने पोबारा केला आहे. तर यापूर्वीही मोठ्याप्रमाणात मोटार चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वीच पठार भागात घरफोड्यांचे सत्र सुरू होते. मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या. आता चोरट्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या विहिरीतील, शेततळ्यातील पाण्याच्या मोटारी चोरण्याकडे वळवला आहे. त्याची सुरुवात खंडेराया वाडीतून झालेली दिसते.

दरम्यान नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जनावरे देखील चोरण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत बऱ्याच तक्रारी असून गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या खंडेरायवाडी येथे अभिजीत संजय तळेकर हा तरूण राहात आहे. त्याची शेततळ्यात इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार होती. अज्ञात चोरट्याने कशानेतरी तोडून शेततळ्यातील मोटार चोरून नेली आहे. तळेकर यांनी मोटारीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. 3 हॉर्स पॉवर ची ही इलेक्ट्रिक मोटार होती.

याप्रकरणी अभिजीत तळेकर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस.आर. खैरे हे करत आहेत.
यापूर्वीही अज्ञात चोरट्यांनी अनेक शेतकर्‍यांच्या विहीर, शेततळे, नदी याठिकाणाहून मोटारी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा चोरट्यांनी मोटारी चोरी करण्यास सुरूवात केल्याने शेतकरी वैतागले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!