नगर एलसीबीच्या बदली झालेल्या पोलिसांचा ‘रक्षणकर्ता’ कोण ?

चौकशी करून कायदेशीर कारवाईचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली होती तक्रार

प्रतिनिधी —

नगर जिल्ह्यात विविध कारवाया करताना नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात आणि उलट सुलट चर्चांमध्ये असणाऱ्या पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये (एलसीबी) करण्यात आलेल्या बदल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत कार्यमुक्ती करण्यात आली नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात होता. या मागचे नेमके गौड बंगाल’ काय असा सवाल उपस्थित झाला होता. बदली झालेल्या पोलिसांचा ‘रक्षणकर्ता’ कोण ? या सर्व प्रश्नांना आता उत्तर मिळणार असून सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शेख यांनी केलेली तक्रार ही गंभीर स्वरूपाची असून याची संपूर्ण चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच कारवाईचा अहवाल सात दिवसात सादर करावा. असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

शाकिर शेख यांनी केलेल्या सविस्तर तक्रारीत म्हटले आहे की, अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. अद्यापही त्यांना कार्यमुक्त न केल्यानेस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक यांना चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांनी पोलीस कर्मचारी दर्जाचे एकूण ९२५ व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते चालक पोलीस शिपाई दर्जाचे एकूण ५९ असे संदर्भ आदेशान्वये दि.३०/०४/२०२३ रोजी बदल्या करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील एकूण ३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे शेख यांनी दि.०६/०४/२०२३ रोजी सविस्तर तक्रार केली होती.

ज्या कर्मचाऱ्यांना ६ वर्षे पूर्ण झालेले आहेत.व आस्थापना सूचीवर मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी नेमणूकीस ठेवण्यात आलेले आहेत.  ३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतू एकाही कर्मचाऱ्याची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आलेली नाही.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ३१ कर्मचाऱ्यांपैकी १७ कर्मचाऱ्यांना एक वर्ष एवढा मोठा कालावधी होऊ नये कार्यामुक्त केलेले नाही. ( बदलीच्या ठिकाणी सोडलेले नाही)  व त्या कर्मचाऱ्यांना जिल्हापोलीस आस्थापना मंडळाने मुदतवाढही दिलेली नाही. असे असताना वरीष्ठांच्या आदेशाचा अवमान करुन सदर कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवलेले आहे. त्याचबरोबर अनेक कर्मचारी सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे कामाच्या सोयीसाठी दाखवून स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले आहे.

सायबर पोलीस ठाणे हे संपूर्णपणे स्वतंत्र असून ते स्थानिक गुन्हे शाखे अंतर्गत येत नसतानाही पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्याकडील आदेश क्र.कक्ष-१(१)/असि-आस्था/बदली नेमणूक/४९४६/२०२३ दि.०३/०४/२०२३ च्या आदेशान्वये सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे पोलीस निरीक्षक पदावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे नवीन नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु त्यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कामकाज सुध्दा देण्यात आलेले आहे. सदरची बाब संयुक्तीक नाही. सायबर पोलीस ठाणे येथे स्वतंत्र पोलीस निरिक्षक पद मंजूर असताना त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्याची नेमणूककरण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध असताना किंवा इतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक उपलब्ध असूनही अधिकाऱ्याची नेमणूक न करता आहेर यांच्या कडे गेल्या १ वर्षापासून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरच्या आस्थापना सूचीवर दोन पोलीस निरीक्षक पदे मंजूर असताना एकच पोलीस निरीक्षक पद भरण्यात आलेले आहे.

अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळा मध्ये मोठा असून जिल्हयामध्ये एकूण १४ तालुके आहे. ७ महसूल विभाग आहेत. या बाबी विचार करता २ पोलीस निरीक्षक नेमणूक करणे आवश्यक असताना नेमणूक करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची सायबर पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखेत येथे नेमणूक नसताना कामाच्या सोयीसाठी त्या कर्मचाऱ्यांना सायबर पोलीस ठाणे येथे तपासकामी तात्पुरत्या स्वरुपात संलग्न नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलीस आस्थापना मंडळाची पूर्वपरवानगी देखील घेण्यात आलेली नाही. सदरची बाब नियमाच्या विरोधात आहे. अशी सविस्तर तक्रार शाकीर शेख यांनी पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र नाशिक यांच्याकडे केली होती.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!