अंधश्रद्धांना फाटा देत संत रविदासांचे विचार आचरणात आणा — कवी सुभाष सोनवणे
प्रतिनिधी —
प्रचंड संघर्षमय जीवन, अंधश्रद्धा व कर्मकांड यांना थारा न देणारे विज्ञानवादी-समतावादी विचारवंत म्हणजे संत शिरोमणी रविदास महाराज होते. समाज बांधवांनी अंधश्रद्धा न बाळगता व्यसनमुक्त राहून संत रविदास यांच्या विचारांचे आचरण करावे. असे प्रतिपादन कवी सुभाष सोनवणे यांनी केले.

संगमनेर मध्ये नुकतीच चर्मकार विकास संघ यांच्या वतीने संत रविदास यांची जयंती विविध उपक्रमांनी पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, काळूराम ढोबळे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, ॲड. आदिनाथ बाचकर, समाजसेवक बाबा खरात, माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, संगीता वाकचौरे, ज्ञानेश्वर राक्षे, आदित्य घाडगे, सोमनाथ मदने उपस्थित होते.

दुर्गाताई तांबे यांनी सांगितले की, वधू-वर मेळाव्यात पालकांनी समजदार, निर्व्यसनी व कर्तबगार मुला – मुलींना प्राधान्य देत साध्या पद्धतीने विवाह करावेत.
समाजसेवक बाबा खरात यांनी म्हणाले की, जातीपातीच्या भिंती पाडून संत रविदास यांनी सांगितलेला समता, बंधुतेचा विचार अनुसरत आनंदी जीवन जगावे.

यावेळी चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन वाघ, काळूराम ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी संगमनेरमध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान करून संत रविदास यांना अभिवादन केले. आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मोफत वधु-वर पालक परिचय मेळाव्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिक येथील मनिषा वाघ यांना चर्मकार विकास संघाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.एस देव्हारे, भाऊसाहेब सोनवणे, लक्ष्मण वाघ, प्राचार्य कारभारी वाकचौरे, केंद्रप्रमुख यशवंत आंबेडकर, सिताराम बोऱ्हाडे, अशोक बोऱ्हाडे, गोरक्षनाथ कांबळे, विनायक वाकचौरे, मनोज वाकचौरे, अनिल वाकचौरे, भास्कर थोरात, उषा कांबळे, साधना बोऱ्हाडे, तुषार बोऱ्हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक वधू-वर सूचक मंडळाचे राज्यध्यक्ष रामदास सोनवणे यांनी केले. यावेळी राज्यभरातील मोठ्या प्रमाणात समाज बांधव कार्यक्रमासाठी, वधू-वर परिचय मेळाव्यासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब वाघ, प्रदीप कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र कांबळे यांनी केले.


आपण करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे.व
त्या कार्याचा सर्व समाजाला होईलच पण त्यामुळे
समाजात एक नवीन उर्जा निर्माण होईल. व समाज सुधारनेस मदत होईल. आपण करत असलेल्या कार्यास खुप खुप सुभेच्छा.
धन्यवाद.