आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जोर्वे येथे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान !
प्रतिनिधी —
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्यात आनंद सोहळा म्हणून साजरा झाला. यावेळी जोर्वे या त्यांच्या गावी गावातील कर्तुत्वान महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हळदी कुंकवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

जोर्वे येथे दत्त मंदिर प्रांगणात डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते जोर्वे गावातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी थोरात, सुनंदा दिघे, मंगल काकड, संगीता थोरात, पुनम बर्डे, अरुणा इंगळे, सुरेखा दिघे, अलका दिघे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित महिला भगिनींचा शाल सन्मानचिन्ह देऊन ज्योती सत्कार करण्यात आला. तर सर्व महिला भगिनींनी हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

डॉ.थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात नेतृत्व करत आहेत. संगमनेर तालुका हा त्यांनी कुटुंब मानले आहे. जोर्वे हे गाव त्यांची जन्मभूमी असून या गावावर त्यांचे विशेष प्रेम आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील कष्टकरी आणि कर्तुत्वावर महिलांचा आपण सन्मान करत आहोत.

घरातील प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे. कारण प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा वाटा असतो. ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबात महिला खूप कष्ट करत असतात. मात्र त्यांच्या कष्टाला जितके महत्त्व दिले जात नाही. महिलांनो कष्ट करा, मात्र याबरोबर स्वतःचे आरोग्य सांभाळा, शिक्षण आणि आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठीच आपण काम करत आहोत.

आमदार बाळासाहेब थोरात हे आपल्या गावचे सुपुत्र आहेत त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचा आपल्या सर्वांना अभिमान वाटत असून यापुढील काळात आपल्यातील मतभेद विसरून सर्वांनी भक्कमपणे तालुक्याच्या विकासाकरता एकत्र राहू या असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा दिघे यांनी केले सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले तर सुविधा काकड यांनी आभार मानले. यावेळी गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या.
