गांधीनगर (संगमनेर) मध्ये बालमेळावा मोठ्या उत्साहात साजरा !

प्रतिनिधी —

प्रजासत्ताक दिनी संगमनेर तालुक्यातील गांधीनगर येथील मासुम संविधान फेलोशिप अंतर्गत सुरू असलेल्या अच्छी आदत उपक्रमातील अण्णाभाऊ साठे संविधान गटाच्या वतीने लोकशाही उत्सव-२०२४ च्या निमित्ताने बालमेळावा उत्साहात पार पडला.

यावेळी बालकांनी वस्तीतून संविधान पोस्टर हातात घेऊन प्रभात फेरी मारून कार्यक्रमास सुरुवात केली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब खेमनर हे उपस्थित होते.

त्यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा करायचा याचे महत्त्व सांगितले. सर्व महामानवांनी केलेल्या महान कार्यामुळे आज आपण आनंदाने जगत आहोत असेही ते म्हणाले. सचिन खाडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सदिच्छा दिल्या. पाहुण्यांच्या मनोगतानंतर गटातील बालकांनी मनोगत व्यक्ती केली.

सर्वांची मनोगत संपल्यावर संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटातील बालकांनी देशभक्तीपर गीत, नृत्य व नाटक सादर केले. शेवटी स्वप्निल मानव यांनी उपस्थित पालक व बालकांसोबत संवाद केला यावेळी संविधान गटातचे महत्व काय आहे हे सांगितले व जबाबदार नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडत असताना संविधान समजून घेणे किती आवश्यक आहे यावर संवाद साधला.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन संविधान गटातील प्रणाली बाळासाहेब गोर्डे, दिक्षा आनंदा साबळे, महिमा भाऊसाहेब खरात व शीतल भिवा घोडे यांनी केले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शीतल घोडे हिने केले व कार्यक्रमाचा समारोप झाला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!