थोरात कारखान्याचा शुक्रवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ !
प्रतिनिधी —
सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ – २४ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवार दिनांक २० ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता आमदार बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात १० लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप केले आहे. शेतकरी, सभासद, कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास असून या कारखान्याने यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना सर्वाधिक २८३५ रुपये भाव दिला आहे.

हे वर्ष अमृत उद्योग समूहाचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजनही केले आहे.

चालू वर्ष गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभाची शुक्रवारी कारखान्याचे संचालक मिनानाथ गोपीनाथ वर्पे व त्यांच्या पत्नी हिरा मिनानाथ वर्पे, डॉ. तुषार दिनकर दिघे व सुरेखा तुषार दिघे, माणिकराव दाजीबा यादव व लता माणिकराव यादव, संभाजी दगडू वाकचौरे व सिंधू संभाजीराव वाकचौरे, संचालिका मंदा शेखर वाघ व शेखर तुकाराम वाघ यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन पूजा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

