दूधगंगा अपहार प्रकरण 

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सह इतर पसार आरोपींचा शोध घ्या …. 

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्या पोलीस अधीक्षकांना सूचना

प्रतिनिधी —

संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही मोकाट असलेला दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे त्याचे कुटुंबीय आणि इतर पसार आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, संगमनेरच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या आणि  सहकार क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेच्या ८१ कोटीच्या अपहर प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब कुटे व त्याचे कुटुंबीय व इतर हे गुन्हा दाखल झाल्यापासून प्रसार झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी इतर पाच आरोपींना अटक झाली होती.

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे व परिवारातील गुन्हे दाखल असलेल्या आरोपी आणि बँकेचे कोट्यावधी रुपये घेतलेले इतर आरोपी पसार झाले होते. कुटे आणि परिवाराने संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

१९ ऑगस्ट २०२३ रोजी हा गुन्हा दाखल झाला असून संगमनेर शहर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केल्यानंतर हा गुन्हा नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर मात्र या तपासात कुठलीही प्रगती झालेली दिसून आली नाही. आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधल्यानंतर तपास चालू आहे. शोध चालू आहे. एवढीच माहिती मिळाली. अटकपूर्वक जामीन फेटाळल्यानंतरही आठ दिवस झाले तरी आरोपींना पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना यश आलेले नाही. गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याचा कालावधी होत आला असला तरी पोलिसांकडून याबाबत संथ गीतेने तपास सुरू असल्याची चित्र पाहण्यास मिळते.

या अपहाराने पीडित असलेल्या ठेवीदारांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. आरोपींवर कड़क कारवाई करावी. त्यांची संपत्ती जप्त करावी अशा मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत. आरोपी पसार झाले असे जरी सांगितले जात असले तरी ते उजळ माथ्याने फिरत आहेत. पोलीस त्यांच्यापर्यंत कसे पोहोचत नाहीत असा सवाल ठेवीदार व सभासदांमधून व्यक्त केला जात आहे.

भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना, देवळाली प्रवरा (राहुरी) येथील राजकीय प्रतिष्ठित कदम कुटुंबीय, औरंगाबाद येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज अहमदनगर येथील संदीप दगडू जरे यांच्यापैकी एकाही आरोपीला जिल्हा पोलीस अद्याप पकडू शकले नाहीत. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

२५ सप्टेंबरला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील शकुंतला भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे व अमोल भाऊसाहेब कुटे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहे. कुटे आता आपल्या परिवारासह औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम अजित कृष्णराव कदम सुजित कृष्णराव कदम यांच्यासह अहमदनगर येथील संदीप दगडू जरे हे या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असून याशिवाय सहाय्य करणाऱ्या सहा जणांसह २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!