ख्रिस्ती विकास परिषद ही समतेची चळवळ — अनिल भोसले

प्रतिनिधी —

ख्रिस्ती विचार प्रणालीवर ज्यांची खरोखर श्रद्धा आहे त्या प्रत्येकाच्या सहभागातून उभी राहिलेली महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद ही समतेची चळवळ असल्याचे प्रतिपादन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी केले. लोणी येथे झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

भोसले पुढे म्हणाले, सर्व पंथीयांना यांना बरोबर घेऊन समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने अतिशय चांगला प्रयत्न होत असून, जिल्ह्यात ख्रिस्ती समाजाची संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जात पडताळणी, ओबीसी दाखल्या संदर्भातील येणाऱ्या अडचणी, शासकीय योजनेबाबत, ख्रिस्ती समाजासाठी महामंडळाच्या मागणी संदर्भात, जात व धर्मातील होत असलेली तफावत, समाजातील वाढती बेरोजगारी, तसेच ख्रिस्ती समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारासंदर्भात या ज्वलंत प्रश्नावर जिल्हाध्यक्ष दीपक कदम, रवींद्र गायकवाड, अंतोन भोसले, फिलिप कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तर परिषदेच्या अहमदनगर जिल्हा ग्रामीण विभाग युवा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुहास ब्राह्मणे यांची तर, जिल्हा सल्लागार पदी रवींद्र गायकवाड, फिलिप कदम, जिल्हा संघटक विशाल पंडित, प्रवरा परिसर विभाग संघटक रवी बोर्डे यांना अनिल भोसले व दीपक कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी यशस्वी फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे यांच्या कामाचेही यावेळी कौतुक करण्यात आले. बैठकीची प्रस्तावना दीपक कदम यांनी केली तर सुहास ब्राह्मणे यांनी शेवटी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!