नादूंरी – दूमाला येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांना राजहंसचे स्मार्ट कार्ड वाटप
प्रतिनिधी —
राजहंस दूध उत्पादक प्रक्रिया संघ यांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजनेचा शुभारंभ मौजे नादूंरी-दूमाला येथे कृषीकन्या सहकारी दूध संस्थेच्या दूध उत्पादक संस्था नादूंरी-दूमाला येथे संगमनेर तालूका सहकारी दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी देशमुख म्हणाले कि, राजहंस दुध संघाने कायम शेतकऱ्यांचे हित जोपासले असून दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना दूध संघाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. स्मार्ट कार्ड ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. स्मार्ट कार्ड मध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती. वर्षभराची दुधाची उलाढाल, आर्थिक उलाढा व्यवहारांची व दुधाचा दर याची माहिती स्मार्ट कार्ड मध्ये समाविष्ट असणार आहे. शेतकरी कोणत्या दुध संस्थेचा आहे, दूध संघाचा सदस्य आहे शेतकऱ्याची ओळख निर्माण होणार आहे. तसेच पशुवैद्यकीय सेवा माहिती समाविष्ट होणार आहे. यात गाईंचे औषधोपचार याबाबत सर्व काही माहितीचा समावेश असणार आहे. औषध उपचारासाठी औषधे दूध उत्पादक, सभासद शेतकऱ्यांना पाच टक्के सवलतीच्या दरात मिळणार आहे. संघाचे अधिकृत उपपदार्थवर पाच टक्के सवलती मध्ये मिळणार आहे. हे कार्ड फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे.

तसेच पशुखाद्य सवलतीच्या दरात या कार्डवर मिळणार आहे. त्यामध्ये एक लाखाचे विमा कवच मिळणार आहे. भविष्यात अनेक योजनांचा लाभ कार्डवर मिळणार आहे.
यावेळी पांडूरंग घूले, साहेबराव कवडे, रमेश गुजांळ, विलास वर्पे, संतोष मांडेकर, भास्कर सिनारे, तुकाराम दातीर, संजय पोकळे, प्रमोद पावसे, गोरक्षनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ.खिलारी, तान्हाजी नेहे, बाळासाहेब शेटे, लक्ष्मण शेळके, भाऊसाहेब नेहे, तुकाराम कवडे, निवृत्ती शेटे, भास्कर गोपाळे, मनिष गोपाळे, सतिष खताळ, ॲड.मिनानाथ शेळके, सरपंच अर्चना शेळके, उपसरपंच सोमनाथ पथवे, सोन्याबापू नेहे, बादशहा कवडे, सिताराम शेटे, मारूती कवडे, दशरथ कदम तसेच कृषीकन्या सह दूध संस्थेचे सर्व संचालक मंडळ, दुध उत्पादक युवक,महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याकार्यक्रमाचे प्रास्ताविक दुध संघाचे संचालक विलास कवडे यांनी केले तर सिताराम शेटे यांनी आभार मानले.
