सकल हिंदू भगवा मोर्चा :

सुदर्शन चॅनलचे सुरेश चव्हाणके यांच्या सह बजरंग दलाच्या दोघांवर गुन्हा दाखल !

चिथावनीखोर, प्रक्षोभक, धार्मिकतेढ निर्माण करणारे भाषण.. 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचे उल्लंघन

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात निघालेला सकल हिंदू भगवा मोर्चा व त्यानंतर झालेली दगड फेक हे प्रकरण अद्यापही शांत झालेले नसुन शहर पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणे, प्रक्षोभक भाषण आणि त्याचे आयोजन या संदर्भाने सुदर्शन चॅनलचे सुरेश चव्हाणके, बजरंग दलाचे योगेश सुर्यवंशी आणि विशाल वाकचौरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादी वरुन या तिघांवर गु.र.नं. ५१२/२०२३ भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ३४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहरात जोर्वे नाक्यावर हिंदू तरुणांना झालेली जीवघेणी मारहाण, त्याच्या निषेधा साठी निघालेला सकल हिंदू भगवा मोर्चा आणि त्या नंतर झालेली दगड फेक हा विषय आजही ऐरणीवर आहे.

सकल हिंदू भगवा मोर्चा नंतर झालेली दगड फेक संगमनेरच्या शांततेला गालबोट लाऊन गेली. त्याचे परिणम सर्वांच भोगावे लागले आहेत. पोलिसानी त्या नंतर केलेल्या कारवाईत अनेक गुन्हे दाख केले. अजुनही कारवाई थांबलेली नाही. दगडफेक करण्यात सहभागी असलेले तसेच त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनात सहभागी असलेल्यांवर देखील पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सकल हिंदू समजाच्या भगव्या मोर्चानंतर झालेल्या सभेत सुरेश चव्हाणके, सुदर्शन चॅनल (रा.दिल्ली), योगेश मनोहर सूर्यवंशी (रा.अकोले नाका, संगमनेर) ( बजरंग दल तसेच एकलव्य आदिवासी संघटना नेता ) आयोजक विशाल भगवान वाकचौरे (बजरंग दल, विहिप रा. संगमनेर) यांनी जातीय दंगा घडवून आणण्याकरीता बेछुटपणे, बेदरकारपणे चिथावणी देणारी भाषणे करुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. त्यांना सदर कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या परवानगी मधील अटी व शर्ती तसेच  सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी रिट याचीका क्र.943/21 तसेच याचीका क्र. 940/22 यामध्ये दिनांक 13 /1/23 रोजी निर्गमित केलेल्या न्याय निर्णयाचे उल्लंघन केले. अशी फिर्याद यादव यांनी दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!