बकरी ईद व आषाढी एकादशी शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू !
७१ व्यक्तींना संगमनेर अकोले तालुक्यात प्रवेश करण्यास बंदी
प्रतिनिधी —
आगामी काळामध्ये येणारी बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण शांततेने व उत्साहाने साजरे व्हावे यासाठी तसेच कोणत्याही रेकॉर्डवरील व्यक्तींकडून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर आणि अवैध प्रकारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबतची माहिती संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

पोलीस रेकॉर्डवरील ७१ व्यक्तींचे दिनांक 22 /6/ 2023 ते दिनांक 30 /46/ 2023 पर्यंत आठ दिवसांसाठी सीआरपीसी कलम 144 (2) खाली संगमनेर शहर व संगमनेर तालुका त्याचप्रमाणे अकोले तालुक्यामध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

त्यानुसार उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी उपरोक्त सर्व ७१ व्यक्तींना सीआरपीसी 144 (दोन) खाली वरील नमूद कालावधीसाठी संगमनेर व अकोले तालुका हद्दीमध्ये प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे..

सात दिवसांसाठी सदर व्यक्तींना प्रवेश बंदीचे हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. पोलीस प्रशासनाकडून सदरचे आदेश बजावण्याचे कामकाज सुरू असून आधीच बजावल्या नंतर दिनांक 22/6/ 2023 ते 30/6/2023 पर्यंत यातील व्यक्ती पुन्हा हद्दीमध्ये मिळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.

येणारे सण अर्थात बकरी ईद/ आषाढी एकादशी हे शांततेमध्ये व कोणतेही अनुचित प्रकार न होता साजरे व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत असे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

