संगमनेर : सारोळे पठार (घारगाव) येथे घरफोडी !

४ लाख २० हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास…

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाली असून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे पठार भागात भीतीचे वातावरण आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोऱ्यांचे आणि घरफोडीचे प्रमाण कमी झालेले नाही हे या घटनेवरून दिसून येत आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारोळे पठार या गावात ही घोरपडे झाली असून चोरट्यांनी एकूण ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. रोहिदास विष्णू घुले (रा. सारोळे पठार, तालुका संगमनेर, जिल्हा नगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

रोहिदास घुले हे आपल्या कुटुंबासह त्यांच्या सासरवाडीला (मांडवे खुर्द तालुका पारनेर) येथे गेले असता त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यामध्ये ७५ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.

घुले यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात सुरू असलेल्या चोऱ्या घरफोड्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातत्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. विशेष म्हणजे यामागे झालेल्या घरफोड्या आणि चोऱ्यांचा तपास देखील अद्याप लागलेला नाही.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!