संगमनेर बस स्थानकावर सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास !

प्रतिनिधी —

संगमनेर बस स्थानकात एका महिलेच्या पर्स मधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. यामध्ये ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

विद्या ईश्वर जाधव (रा. पिंपरी पेंढार, नवलेवाडी, पुणे) यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्या जाधव या गुरुवारी दुपारी संगमनेर बस स्थानकात अकोले कडे जाणाऱ्या बस मध्ये बसण्यासाठी चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सची चैन उघडून पर्स मधील छोट्या पाकिटातील सोन्याचे मिनी गंठण व रोख रक्कम चोरून नेली आहे.

बंदोबस्तासाठी बस स्थानकावर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे स्थानकावरील चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र कुठलाही फरक पडलेला दिसत नाही, हे या घटनेवरून उघड झाले आहे.

(बातमीतील छायाचित्र संग्रहित)

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!