वाहनांची चोरी करणारा आरोपी जेरबंद ; नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संगमनेर, नगर व गंगापूर येथून बुलेट व ट्रॅक्टरची केली होती चोरी…

प्रतिनिधी —

संगमनेर, नगर आणि गंगापूर येथून बुलेट व ट्रॅक्टरची चोरी करणारा आरोपी नगर स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडला आहे. या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यामध्ये एक बुलेट मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा समावेश आहे.

बुलेट मोटरसायकल आणि ट्रॅक्टरची चोरी करणारा एक सराईत गुन्हेगार चिलेखन वाडी, तालुका नेवासा जिल्हा नगर या ठिकाणी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे. त्याचे इतर तीन साथीदार मात्र फरार आहेत.

किरण अंबादास गर्जे ( रा. चिलेखन वाडी, तालुका नेवासा, जिल्हा नगर), सोमा उर्फ वैभव सुरोडे ( रा. मातकुळी, तालुका आष्टी जिल्हा बीड, फरार), महेश सोनवणे (रा. नॉर्दन ब्रांच, श्रीरामपूर, फरार), अद्दू शेख (रा. जामखेड, फरार) अशी चौघांची नावे आहेत.

या आरोपींनी संगणमताने संगमनेर येथून १ लाख ५० हजार रुपये किमतीची लाल रंगाची बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच १७ सी एफ ७७११ ही घरासमोर लावलेली असतात चोरून नेली होती. तसेच गंगापूर येथून एक ट्रॅक्टर देखील या चोरट्यांनी चोरला होता. या दोन्ही वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, फुरकान शेख, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, अमृत आढाव, किशोर शिरसाट, बाळासाहेब खेडकर यांच्या पथकाने केली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!