जिल्हा परिषदेच्या शाळेतून टीव्ही चोरला !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. अद्याप कुठल्याही चोरीचा तपास लागलेला नसताना तथाकथित अज्ञात चोरटे मात्र चोऱ्या करीतच आहेत. पोलीस चोरटे पकडण्यात नेमके कशामुळे अपयशी होत आहेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही चोरी झाली आहे. चोरी सुट्टीच्या दिवशी झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे. शनिवारी दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी सायंकाळी सात ते रविवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

पिंपळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीचे कुलूप उचकटून, खोलीत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने एलईडी ३२ इंची स्मार्ट टीव्ही चोरून नेला आहे. या टीव्ही ची किंमत २५ हजार रुपये असल्याचे नोंदविण्यात आले आहे. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

कैलास विठ्ठल वाघमारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा पिंपळे तालुका संगमनेर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून सहाय्यक फौजदार पठाण हे पुढील तपास करीत आहेत. छायाचित्र संग्रहित.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!