संगमनेरात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर लुटमार !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात घरफोड्या, दरोडे आणि लुटमारीचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास तालुक्यातील पठार भागातील साकुर येथे तीन अज्ञात चोरट्यांनी रिवाल्वर आणि चाकूचा धाक दाखवत पेट्रोल पंप पंपावर लूटमार केली. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे.

रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास साकुर ते मांडवे रस्त्यालगत असणारा भगवान पेट्रोल पंप (इंडियन पेट्रोल कंपनीचा पेट्रोल पंप) या ठिकाणी दोन मोटार सायकल वरून ३ अज्ञात व्यक्ती आल्या. या तिन्ही अनोळखी इसमानी घटनेतील फिर्यादी व फिर्यादीचे सहकारी यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून आणि दहशत निर्माण करून त्यांच्याकडील २ लाख ५० हजार ७४७ रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

या घटनेने साकुर परिसरात खळबळ उडाली आहे. सुनील हरिभाऊ गिरे (वय २८ वर्षे, धंदा नोकरी, रा. गिरेवाडी, हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. तर या घटनेत अनुदेव अनंत वाटूशरे (रा. घारगाव, ता. संगमनेर) ही व्यक्ती जखमी झाली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

रात्री पावणे अकराच्या दरम्यान ही घटना घडली असताना संबंधितांच्या मदतीस कोणीही धावून आले नसल्याची माहिती समजली आहे. फक्त तीन व्यक्तींनी दोन मोटरसायकल वरून येत रिव्हॉल्वरचा धाक दाखवत ही लुटमार केली आहे. पुढील तपास सहायक फौजदार आर. व्ही. खेडकर हे करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!