आता..

गौण खनिज उत्खनन प्रक्रिया ऑनलाईन — महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होणारी वाळू तस्करी आणि गौण खनिज तस्करीची डोकेदुखी बंद करण्यासाठी तसेच सर्वत्र होणारे अवैध उत्खनन थांबवण्यासाठी ही सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे.

 

प्रतिनिधी —

अवैध गौण खनिज वाहतुक रोखण्यासाठी तसेच उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होणारी वाळू तस्करी आणि गौण खनिज तस्करी ही डोकेदुखी ठेवलेली आहे. विविध आरोप प्रत्यारोप आणि करण्यात येणाऱ्या कारवाया यामुळे चर्चेत आलेली संपूर्ण महसूल यंत्रणा देखील बदनाम झालेली आहे.

वाळू माफियांचे राजकीय पुढार्‍यांशी असलेले संबंध, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे असलेले संबंध यामुळे वाळू चोरी आणि गौण खनिजस्करी थांबत नव्हती. नगर जिल्ह्यात हा प्रश्न महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चव्हाट्यावर आणला होता.

गौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबत बैठक आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार धैर्यशील माने, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विखे- पाटील म्हणाले की, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेकदा उत्खननावर आळा घालणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्लेही झाले आहेत.अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुक रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आणली जाणार आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्याबरोरबच महसूल विभागास याचे नियंत्रण करण्यास सोपे होणार आहे.गौण खनिज उत्खनन ऑनलाईन झाल्यामुळे अवैध गौण खनिज वाहतुकीला चाप लावणे अधिक सोपे होणार आहे.

 

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!