आम्ही फटाके फोडणार नाही..आम्ही प्रदूषण करणार नाही !
बालपण स्कूल पानोडी व आश्वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ…
प्रतिनिधी–
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फटाके मुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिल्यानंतर त्यापासून आदर्श घेत संगमनेर तालुक्यातील बालपण स्कूल पानोडी व आश्वीच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी करण्याची शपथ घेत बऱ्याच पर्यावरण बचाओचा नारा दिला.

आम्ही फटाके फोडणार नाही…..आम्ही प्रदूषण करणार नाही…. बालपण स्कूल पानोडी व आश्वीच्या विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी ची शपथ घेत पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी शाळेतच पारंपरिक पद्धतीने दिवाळीचा दीपोत्सव साजरा केला. दिवाळीचा दीपोत्सव बालपण स्कूल परिक्षेचा शेवटचा दिवस विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी सणाचे सर्व विधी पर्यावरण पूरक पध्दतीने साजरा करत दिवाळी सण साजरा केला.

शाळेने आयोजित केलेल्या फटाके मुक्त दिवाळी या विषयावर चित्रकला स्पर्धा घेत विद्यार्थ्यांनी आकर्षक असे फटाके मुक्त दिवाळीची चित्रं काढली.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी व पर्यावरण वाचविण्याची शपथ घेत “मी फटाके फोडणार नाही, मी प्रदूषण करणार नाही, धरती वाचवा, नो क्रॅकर्स, पर्यावरण रक्षण करण्याचे विविध फलक दर्शवत व घोषणा देत फटाके मुक्त दिवाळीची रॅली काढून लोकांना समाजालाही आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या घरासाठी टाकावू पासून टिकावू या उपक्रमाअंतर्गत कागद, कार्डशिट, घरातील उपयोगात नसलेल्या वस्तू या पासून आकर्षक आकाश कंदील बनवत पर्यावरण रक्षणाचा छोटासा प्रयत्न केला.

आकाश कंदील बनवत आपल्या शाळेसाठी व कुटुंबासाठी एक दिशादर्शक उपक्रम करुन या चिमुकल्यांनी आपला आनंद, उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न केले.

यानंतर शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पहिली पुजा वसुबारसची केली. विद्यार्थ्यांनी गाईची पुजा करत पारंपरिक ‘दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी” हे गीत गात गाईची पुजा करत वसुबारस साजरी केली.

या वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी सर्व धान्य, झाडांच्या पानांपासून बनविलेल्या वाटीत ठेवत आकर्षक पानाफुलांनी सजवत धान्यांची पारंपरिक पद्धतीने पुजा केली.

सर्व पुजेभोवती दिव्यांची आरास, करत दीपोत्सव साजरा केला व शाळेतील विधिवत पुजा केली. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष्मीचे दर्शन घेतले. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना ओवाळत पारंपरिक पध्दतीने भाऊबीज साजरी केली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिसरातील नागरिकांना फटाके मुक्त व पर्यावरण युक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून सण साजरा केला. केजीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकाशकंदीलांनी शाळेच्या इमारतीची सजावट करण्यात आली. हे सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पाडले.

आज संपूर्ण विश्व पर्यावरणाशी लढत आहे. विशेष महत्वाचे म्हणजे फटाके प्रदूषण टाळले तर आपण प्रदूषणापासून बचाव करू शकतो. बालपणच्या चिमुकल्यांनी या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करण्याचे काम केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे तसेच शिक्षक वर्ग, पानोडीचा सर्व शिक्षक वर्ग यांचे योगदान लाभले.

