तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम — आमदार थोरात

प्रतिनिधी —

 

सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या माध्यमातून आपण अविश्रांत काम केले आहे. संगमनेर तालुक्याचे कार्यक्षेत्र व विस्तार मोठा असून प्रत्येक गावात विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. तालुक्यातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे यासाठीच काम होत असून तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे

कोळवाडे येथे पाणीपुरवठा योजना भूमिपूजन व नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, बाळासाहेब गायकवाड, गणपतराव सांगळे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, काशिनाथ गोंदे, भाऊसाहेब नवले, सरपंच जयश्री कुदळ, उपसरपंच मंगेश वर्पे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, बाळासाहेब उंबरकर, नानासाहेब गुंजाळ, सतीश गुंजाळ, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सोपान वर्पे, रामदास तारडे, महादू गोंदे आधी उपस्थित होते. यावेळी सोसायटी कार्यालयाचे भूमिपूजन व कोळवाडे शेतकरी सहकारी प्रोड्यूस कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या जय हिंद आश्रम शाळेच्या माध्यमातून आदिवासी व गोरगरीब विद्यार्थी यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळत आहे. गेली २७ वर्ष या संस्थेने राज्याला अनेक उच्च पदस्थ अधिकारी दिले आहे. त्याचबरोबर या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध योजना राबवल्या आहेत. वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करणे व त्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्यासाठीच अविश्रांत काम केले आहे. चांगल्या कामामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यभरात लौकिक असून दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे ची कालवे ही अंतिम टप्प्यात आहेत. याचबरोबर तालुक्याच्या वाडी वस्तीवर विकासाचा वेग कायम असल्याची ते म्हणाले.

तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सातत्यपूर्ण विकास कामांमुळे संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. शेती, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात संगमनेर तालुक्याचे काम दिशादर्शक आहे. गोरगरीब आणि दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम आमदार थोरात यांनी केले असल्याचे ते म्हणाले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता व आरोग्य बाबत झालेली जाणीव जागृती अत्यंत आनंददायी आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. महिला बचत गटाच्या माध्यमातून या भागात चांगले काम होत असल्याचे ही त्या म्हणाल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, उपअभियंता सौरभ पाटील, श्रीरंग गडदे, एस एम खेमनर, दिलीप कांबळे, रोहिदास कवटे, मच्छिंद्र रावते, हरिदास कुदळ, वैभव कानवडे, अंभोरेचे सरपंच भास्कर खेमनर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर मंगेश वर्पे यांनी आभार मानले

बचत गटाच्या महिलांकडून मोगऱ्याचे हार भेट

कोळवाडे येथे कृषी बचत गटाच्या महिलांनी गटशेतीतून तयार केलेल्या मोगऱ्याचे सुंदर तीन हार आमदार थोरात, आमदार डॉ. तांबे व डॉ. जयश्री थोरात यांनी दिले. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, मनापासून दिलेली ही महिला भगिनींनी भेट असून हे हार जपून ठेवण्यासारखे आहेत .

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!