मनसेचा कोविड योद्धा पुरस्कार व रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी —
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त संगमनेर मध्ये कोविड योद्धा पुरस्कार व रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला.
पडतानी कॉम्प्लेक्सच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. कचेरिया व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमोल कर्पे हे उपस्थित होते.

याप्रसंगी रक्त दात्यानी रक्तदान केले व गेली दोन वर्षे जगाला विळखा घालणाऱ्या कोविड महामारीत ज्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोविडशी सामना करून कोविड रुग्णांवर उपचार केले असे डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर व या काळात साथ देणारे पत्रकार ज्यांनी कठीण काळात आपले कार्य समाज्या पर्यंत पोहचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले व ज्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी कोविड रुग्णांना मोफत जेवण उपलब्ध करून देऊन स्वतः या काळात रुग्णांना देण्याचे काम केले त्यांचाही याप्रसंगी कोविड योद्धा म्हणुन गौरव करण्यात आला.

या मध्ये प्रामुख्याने डॉ. कचेरिया, डॉ. अमोल कर्पे, डॉ. प्रदीप कुटे, डॉ. रवी साबळे, डॉ. सचिन वाळे, डॉ. उदय जोशी, डॉ. वैभव जोंधळे, डॉ. थिटमे, डॉ. जाधव, डॉ. करवा सह पत्रकार गोरक्ष नेहे, विनोद पाळंदे, सुशांत पावसे, सातपुते, गायकवाड यांसह मोफत जेवण पुरविणारे बजरंग दलाचे सचिन कानकाटे, गोपाल राठी, विशाल वाकचौरे, भाजपा युवा मोर्चा कल्पेश पोगुल, जग्गु शिंदे यांचाही कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.

याप्रंगी डॉ. कचेरीया, डॉ.अमोल कर्पे, डॉ. सचिन वाळे, डॉ. रवी साबळे यांनी कोविड काळातील आलेले गोड कटू अनुभव सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर मध्ये महिना भर विविध सामाजिक कार्यक्रम सुरु ठेवणार असुन यामधे ग्रामीण भागात असणारे व कोविड काळात सेवा देणारे यांचा यथोचित सत्कार करणार असल्याचे व भोंग्या विषयी जनजागृतीचे पत्र घरोघर वाटप करणार असल्याचे नमूद केले. तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकुर, यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन दिपक वर्पे यांनी करून आभार तुषार बढे यांनी मानले.

