सायकल रॅली काढून पर्यावरण जनजागृती !

संगमनेर रोटरी क्लबचा उपक्रम 

प्रतिनिधी — 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संगमनेर रोटरी क्लबतर्फे संगमनेर सायक्लिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने संगमनेर शहरातून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक ५ जून रोजी हि सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात सकाळी ७.०० वाजता संगमनेर बसस्थानक येथून करण्यात आली. या रॅलीद्वारे पर्यावरण संवर्धनाविषयी वेगवेगळ्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. शहरातून सुमारे १२० नागरिकांनी तसेच छोट्या मुलांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.

दिलीप कोकणे यांचेहस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. उत्तम आरोग्यासाठी सायकल वापरणे गरजेचे आहे तसेच सायकलच्या वापरामुळे प्रदुषण कमी होण्यासही मदत होईल हा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला. यावेळी विविध ठिकाण पर्यावरणविषयक फलक लावण्यात आले होते.

यावेळी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे सहाय्यक प्रांतपाल दिलीप मालपाणी, अध्यक्ष योगेश गाडे, सेक्रेटरी हृषिकेश मोंढे, सर्व रोटरी क्लब सदस्य, संगमनेर सायक्लिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंजाळ व सर्व सदस्य आदि मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सर्व सायकलस्वारांचे तहसिलदार अमोल निकम यांचेहस्ते गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला तसेच सर्व सायकलस्वारांसाठी यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

या रॅलीमध्ये पर्यावरण विषयक घोषणा देऊन सहभागी पर्यावरण प्रेमीचें स्वागत व अभार संजय कर्पे यांनी केले. रॅली यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख मधुसुदन करवा, विश्वनाथ मालाणी, संदीप गुंजाळ यांची विशेष मेहनत घेतली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!